Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविड सेंटरमध्ये असुविधा आढळल्यास थेट संपर्क साधा- जिल्हाधिकारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोविड सेंटरमध्ये असुविधा आढळल्यास थेट संपर्क साधा- जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची फैजपूर येथे कोविड सेंटर ला भेट

फैजपूर(किरण पाटील)-  जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज फैजपूर येथील कोविड सेंटरला भेट देऊन स्थानिक अधिकार्‍यांशी कोरोनाच्या प्रतिकाराबाबत चर्चा केली. याप्रसंगी त्यांनी रूग्णांना सर्वतोपरी सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले. कुणाला काहीही असुविधा आढळून आल्यास आपल्याशी थेट संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. शहरात कोरोना रुग्ण संख्यामध्ये हळू हळू वाढ होतांना दिसत आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी शहरातील कंटेनमेंट झोन असलेल्या भागात जाऊन व फैजपूर कोविड सेंटर ला जाऊन परिस्थितीचा आढावा प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याकडून घेतला.कोरोना संसर्गजन्य आजार हा आता ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर पाय पसरू लागला आहे. यातच आज पोलीस प्रभारी अधिकारी यांची मुलगी व तीन कर्मचारी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे व पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव ओगले यांनी शहरात येऊन कंटेनमेंट झोन भागात पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लागलीच फैजपूर कोविड सेंटर जाऊन तेथील रुग्णाच्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, जे संशयित रुग्ण ऐकत नसतील त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करावे तसेच कोविड सेंटरमध्ये कुठल्याही सुविधांची कमतरता भासता कामा नये. काही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे असे आवाहन त्यांनी केले. रूग्ण बरा करावा हे आपले कर्तव्य असून सध्याची परिस्थिती किती दिवस राहील याची कुणालाही कल्पना नाही. म्हणून सर्वांनी आपली व रुग्णाची काळजी घेतली पाहिजे आपल्या खिशातील पैसे खर्च झाले तरी चालतील पण सुविधा कमी पडता कामा नये अशा सूचना दिल्या. यावेळी प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, यावल तहसिलदार जितेंद्र कुवर, रावेर तहसीलदार उषाराणी बहुगुणे, प्रभारी एपीआय राहुल वाघ, फैजपूर मुख्याधिकारी किशोर चव्हान, सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी, पीएसआय रोहिदास ठोंबरे, फैजपूर सर्कल जे. डी. बंगाळे, तलाठी पी. पी. जावळे, डॉ शहनाज तडवी, डॉ कौस्तुभ तळेले, डॉ राहुल गजरे, डॉ मनीषा महाजन, डॉ सुप्रिया थोरबोले यांच्यासह नर्स व कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिक्षिका सुवर्णलता अडकमोल यांनी लेखनातून दिला व्यसनमुक्ती सह महिलांचा सन्मानाचा संदेश

Next Post

शिवछत्रपतींचा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
शिवछत्रपतींचा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवछत्रपतींचा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo