Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या तीस रिक्षा जप्त-परिवहन विभागाची धडक कारवाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या तीस रिक्षा जप्त-परिवहन विभागाची धडक कारवाई

जळगाव-(जिमाका) : शहरातील सेंट टेरेसा, आर. आर. हायस्कुल, गुरुकुल विद्यालय (इंग्लिश मिडीयम), सेंट लॉरेन्स, वर्धमान, ओरियंत या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा व व्हॅनमध्ये कोंबून बेदरकारपणे आणि धोकादायकपणे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने आज धडक मोहिम राबवून कारवाई करण्यात आली. या मोहिमेतंर्गत तीस ऑटो रिक्षा व व्हॅन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येते जप्त करण्यात आल्या आहेत. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

            उप प्रादेशिक परिवहन विभागच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत बऱ्याचश्या रिक्षा व व्हॅनमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक पटीने विद्यार्थ्यांना कोंबून बसविल्याचे आढळून आले, तसेच अनेक विद्यार्थी चालकाच्या सीटवर बसलेले आढळून आले. काही मुलांचे हात, पाय वाहनाच्या बाहेर आलेले आढळून आले. एका व्हॅनमध्ये 24 मुले धोकादायकपणे प्रवास करतांना आढळून आले. अशा प्रकारच्या वाहनावर कडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मोहिमेत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयामधील मोटर वाहन निरीक्षक सचिन दळवी, विकास सूर्यवंशी, दीपक ठाकूर आणि सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग घेतला होता.

            ज्या ज्या शाळेच्या परिसरात धोकादायकपणे वाहतूक करण्यात येते अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा शाळेच्या प्राचार्यांना या मोहमेअंतर्गत समज देण्यात आली आहे. स्कूल बस समितीचे अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी प्राचार्यांची असून अशा प्रकारची वाहतूक होऊ नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या शाळेत येणारे विद्यार्थी हे स्कूल बस मधूनच यावी याबाबतचे त्यांनी नियोजन करण्याची आश्यकता असल्याचेही त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोहि यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव येथे 16 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

Next Post

अपयशातून मनाला उभारी कशी द्यावी?

Next Post

अपयशातून मनाला उभारी कशी द्यावी?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo