Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खडके येथील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/08/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

सखोल चौकशीसाठी पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती

तीन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

जळगाव, दि.३१ जुलै (जिमाका) – एरंडोल तालुक्यातील खडके येथील कै.य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे महिला व बाल विकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तसेच या बालगृहातील बाल लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीला ३ ऑगस्ट पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खडके येथील बालगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणी बालगृहाचे काळजीवाहक गणेश पंडीत, अधीक्षिका अरुणा पंडीत आणि संस्थेचे सचिव भिवाजी दिपचंद पाटील यांचे विरुध्द २६ जुलै २०२३ रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सादर केलेला अहवालानुसार संस्थेमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे ‌. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारीत अधिनियम २०२१ आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ मधील नियम आणि तरतूदींचे उल्लंघन करणारी आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रेमा घाडगे (बाल विकास प्रकल्प अधिकारी,खार सांताक्रुझ नागरी प्रकल्प, मुंबई उपनगर) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती (Special Investigation Team) गठित करण्यात आली आहे . या समितीने तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महिला व बाल विकास उपायुक्त राहूल मोरे यांनी दिले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ पंडित विद्यालयात सेवापूर्ती सन्मान सोहळा

Next Post

डोळे आले आहेत का? मग अशी घ्या काळजी-डॉ. जयेश वाल्हे

Next Post

डोळे आले आहेत का? मग अशी घ्या काळजी-डॉ. जयेश वाल्हे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d