Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून देतो सांगणाऱ्यांच्या अमिषाला बळी पडू नका आदिवासी विकास विभागाचे लाभार्थ्यांना आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून देतो सांगणाऱ्यांच्या अमिषाला बळी पडू नका आदिवासी विकास विभागाचे लाभार्थ्यांना आवाहन


जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) – आदिवासी विभागाच्या खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगून काही व्यक्ती, संघटना लाभार्थ्याकंडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. परंतु लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्यासाठी अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. असे आवाहन श्रीमती विनिता सोनवणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटूंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे पुर्नजीवन राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या दि. 9 सप्टेंबर, 2020 च्या शासन निर्णयाने केले आहे. खावटी अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटूंबीयांना लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी करावयाचे अर्ज, पोचपावती, नोंदवह्या आदी बाबीचे नमुने तयार करण्याचे काम शासन रावर सुरु आहे. तथापी, असे निर्दशनास आले आहे की, काही संघटना, व्यक्ती आदिवासी बांधवांकडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण लाभार्थ्यांना करत आहे. सदर बाब बेकायदेशीर असल्याने अशा तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या खाजगी अमिषाला अथवा गैरप्रकाराला बळी न पडता खावटी अनुदान योजनेबाबत अधिकची माहिती प्राप्त करण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. उपप्रादेशिक कार्यालय, यावल आणि प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती सोनवणे, प्रकल्प अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टरांची व्हिजीट समाविष्ट असल्याने कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये;जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

Next Post

युवा आदर्श शेतकरी मयूर वाघ यांची “कृषीगाथा”

Next Post
युवा आदर्श शेतकरी मयूर वाघ यांची “कृषीगाथा”

युवा आदर्श शेतकरी मयूर वाघ यांची "कृषीगाथा"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo