Tuesday, July 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत : सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
‘कोरोना’चा मृत्यू दर कमी करण्यासाठी टास्क फोर्स: सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

जळगाव येथे आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चेत आवाहन

जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा मृत्यू दर कमी करण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सहकार्य करुन टास्क फोर्ससाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन द्यावेत. तसेच खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. टोपे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आज सकाळी नियोजन भवनात आयएमएच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. एन. एस. चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री श्री. टोपे म्हणाले, सेवाभाव सर्वांत महत्वाचा आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तो रोखण्यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या माध्यमातून उपाययोजना करीत आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत. त्यासाठी आयएमएला दोन हजार पीपीई कीट उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच डेडिकेटेड हॉस्पिटलसाठी फिजिशियन्स व इन्सेन्टीव क्षेत्रातील किमान तीन- तीन तज्ज्ञ उपलब्ध करुन द्यावेत. त्यांना वेतन सुध्दा अदा करण्यात येईल. तसेच सुरक्षेसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी आयएमएने पुढाकार घ्यावा. तसेच जे खासगी रुग्णालये सुरू होणार नाहीत त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने करावी, असेही निर्देश मंत्री श्री. टोपे यांनी दिले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सध्या खासगी रुग्णालये सुरू होण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी सामाजिक भावना जोपासत आपापली रुग्णालये सुरू करावीत, असेही आवाहन केले. खासगी रुग्णालये उद्यापासून सुरू केली जातील, असे आश्वासन आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, डॉ. स्नेहल फेगडे यांनी दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘कोरोना’चा मृत्यू दर कमी करण्यासाठी टास्क फोर्स: सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post

फैजपुरात पांडव निर्जला एकादशी निमित्त इस्कॉन मंदिरात आंब्यांची आरास

Next Post
फैजपुरात पांडव निर्जला एकादशी निमित्त इस्कॉन मंदिरात आंब्यांची आरास

फैजपुरात पांडव निर्जला एकादशी निमित्त इस्कॉन मंदिरात आंब्यांची आरास

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo