Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधीजींचे विचार सर्वोदयी मग गांधी नाकारायचा कसा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/01/2020
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
गांधीजींचे विचार सर्वोदयी मग गांधी नाकारायचा कसा

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवाचन सादर

जळगाव दि.30 प्रतिनिधी :- कोणत्याही विधायक विचारातूनच मनुष्य घडतो. माणसाला माणूसकी प्रमाणे जगण्याची शिकवण देणारे विचार जगातील अस्थिरता दुर करू शकतात. स्वातंत्र्याच्या विचारात महिलांसह सर्वसामान्यांना महात्मा गांधीजींनी जोडले. सद्यपरिस्थितही गांधी नाकारायचा पण कसा? कारण गांधीजींचे विचार सर्वकालीन, सर्वव्यापी सर्वोदयी असून ते शाश्वत आहे.

     महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे  बा-बापू 150 व्या जयंती वर्षनिमित्त ‘गांधी नाकारायचाय पण कसा?’ या विषयावर अभिवाचन सादर करण्यात आले. गांधीतीर्थच्या कस्तुरबा सभागृहामध्ये गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, दलिचंदजी जैन, डॉ. भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना. धों. महानोर उपस्थित होते.

     महात्मा गांधीजींना विविध आरोपांच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांना नाकारायचा यासाठी दिशाभूल करणारे अनेक मात्र वस्तुस्थितीला धरून इतिहासातील संदर्भ तपासले असता गांधीजींचे विचार त्यांच्याजवळ घेऊन जातात. गांधीजींचे विचार हे कसे सत्य, अहिंसेला धरून काळानुरूप लागू होतात, गांधीजींविषयीचा समज-गैरसमज विनोदाच्या शैलीने हळूहळू अधोरेखित होत जातात. अभिवाचन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी लिहले असून त्यांनीच दिग्दर्शनही केले. मंजुषा भिडे, नारायण बाविस्कर, होरिलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटील, विजय जैन यांनी अभिनय केला. तर पार्श्वसंगीत राहुल निंबाळकर यांनी दिले. वसंत गायकवाड, विशाल कुलकर्णी यांनी निर्मिती प्रमुख म्हणून काम पाहिले.

आरंभी मान्यवरांच्याहस्ते लाईव्ह ट्रेड निर्मित गांधीतीर्थ महात्माचे यथार्थ दर्शन डॉक्युमेंट्रीचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी लाईव्ह ट्रेडचे संपादक शेखर पाटील, विवेक उपासनी, विजय वाघमारे व सहकारी उपस्थित होते. स्मिता गुप्ता यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. सुरवातीला अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घुम चरखा घुम या भजन म्हटले. आश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.

हुतात्मा दिनानिमित्त सहकाऱ्यांनी पाळले मौन

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन पाळला गेला. यानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी, जैन हिल्स, जैन अॅग्री पार्क, जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये सकाळी 11 वाजता दोन मिनटांचे मौन पाळून महात्मा गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संध्याकाळी 5.17 मिनिटांनी गांधीजींची हत्या करण्यात आली यावेळेला गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे सर्वधर्म प्रार्थना करण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्रात महात्मा गांधी पुण्यतिथी निमीत्त अभिवादन

Next Post

कृषीपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Next Post

कृषीपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo