Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अहिंसा सदभावना शांती यात्रेतून समतेचा संदेश; गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2026
in जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read
गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अहिंसा सदभावना शांती यात्रेतून समतेचा संदेश; गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम

जळगाव दि. २ प्रतिनिधी – सध्या जगात संघर्ष, अस्थिरता, परस्परावलंबित्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गांधीजींच्या अहिंसा, शांतता आणि सदभावनेच्या विचारांची गरज आहे. स्वदेशी, स्वच्छता, ग्रामविकास, पारंपरिक व्यवसायांचे जतन, श्रमदान व सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा स्वीकार करूनच सुजाण नागरिक म्हणून सक्षम पिढी घडेल, असे ठोस प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती देशभर साजरी करण्यात येते. विश्व अहिंसा दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे अहिंसा सदभावना शांती यात्रेचे यानिमित्ताने आयोजन करण्यात आले होते. लालबहादूर शास्त्री टॉवरपासून सुरु झालेल्या यात्रेची सांगता महात्मा गांधी उद्यानातं झाली. यात्रेच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रोहन घुगे बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, उपवनसंरक्षक अधिकारी सौरेश सहाय, मनपा आयुक्त आदित्य जीवने, प्रांत अधिकारी योगेश कुमार मीणा, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, राजेंद्र मयूर, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत तिरंगा सूतीहार देऊन उदय महाजन व गिता धरमपाल यांनी केले. यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी उपस्थितांना अहिंसेची शपथ दिली. सुरवातीस दीपस्तंभच्या दिव्यांग कलाकारांनी ‘वैष्णव जन तो तेणे कहिए…’ हे गीत सादर केले.

अहिंसा सदभावना शांती यात्रा

लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अहिंसा सदभावना शांती यात्रा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरु झाली. पंडीत नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. हेडगेवार चौक मार्गे जाऊन महात्मा गांधी उद्यानातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सुतीहार अर्पण करून सांगता झाली. यात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी भारत माता, कस्तुरबा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासह राष्ट्रपुरूषांच्या वेषभूषेत सहभाग घेतला. बैलगाडीवरील चरख्यावर अखंड सुतकताई करण्याची सजीव आरस हे आकर्षण ठरली. शेकडोंच्या संख्येने विविध शाळा, संस्थामधील जळगावकर सहभागी झाले.

रोहन घुगे पुढे म्हणाले की, गांधीजींचे जीवन जवळून पाहिले तर त्यांच्या महानतेचे कारण त्यांनी कधीच चुका केल्या नाहीत हे नव्हे, तर स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारून त्यांची पुनरावृत्ती होऊ दिली नाही, हे लक्षात येते. ‘माझे सत्याचे प्रयोग’मधून त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंग मोकळेपणाने मांडले. सत्य, अहिंसा, स्वदेशी, सद्भावना, श्रमदान आणि स्वच्छता या मूल्यांचा संदेश त्यांनी केवळ शब्दांतून नव्हे, तर स्वतःच्या आचरणातून दिला. ‘बोले तैसा चाले’ हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद होती. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा आजच्या पिढीने आदर्श घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. शास्त्रीजींच्या काळात देशाने अन्नटंचाई आणि अनेक आव्हाने पाहिली; त्यातून हरितक्रांती, दुग्ध सहकार आणि अन्नसुरक्षेच्या दिशेने देशाने वाटचाल केली. गांधीजींच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी जळगावातील गांधी रिसर्च फाउंडेशन महत्त्वाचे कार्य करत आहेत.
गिरीष कुलकर्णी यांनी सूूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

अनुभूती बालनिकेतनच्या विद्यार्थ्यांकडून सादरीकरण

अनुभूती बालनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी ‘गांधीजी के बंदर हम’ हे गीत अभिनयासह सादर केले. शुभदा नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थम अथांग जैन, लिटसा मनीष जैन, आरव हर्षद जैन, अनायशा आशिष बन्सल, रचित कुणाल राजपूत यांचा समावेश होता.

भारत की संतान मधून १८ भाषांसह संस्कृतीचा गौरव..

‘भारत की संतान’ हा देशाच्या विविधतेतील एकतेचा संदेश देणारा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. ‘आम्ही सर्व एक आहोत’ हा या कार्यक्रमाचा प्रमुख संदेश होता. कार्यक्रमाविषयी नरेंद्र वडगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या १८ भाषांमधील विविधता, त्या-त्या भाषिक प्रदेशांची वेशभूषा आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी घडवले. विविधतेतून एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे हे सादरीकरण उपस्थितांना भावले.

गांधी तीर्थ सामूहिक गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

गांधी जयंती निमित्ताने आयोजित गांधीतीर्थ जिल्हास्तरीय सामूहिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे याप्रसंगी पारितोषिक वितरण करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील एकूण २६ संघ यात सहभागी होते. या स्पर्धेतील विजयी संघांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक ब. गो. शानभाग विद्यालयाने पटकावला. त्यांना रूपये ११ हजाराचे पारितोषिक व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत गायलेले गीत सादर केले. तसेच ग्रामीण विभागामधून धनाजी नाना माध्यमिक विद्यालय, खिरोदा यांनी प्रथम, विरवाडे येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालय यांना द्वितीय, तोंडापूर, जामनेर येथील र. सु. जैन विद्यालयाला तृतीय तर वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.

शहरी विभागामध्ये ओरियन सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलला प्रथम, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलला द्वितीय, अनुभूती इंटरनॅशनल स्कूल, शिरसोली रोड, जळगावला तृतीय क्रमांक तर काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.

अहिंसा सदभावना यात्रेत सहभागी शाळा

इंपिरिअल इंग्लिश मिडीयम स्कुल, अनूभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, हरिजन कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनी, शोधग्रामचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, ब. गो. शानबाग विद्यालय, एल. एच . पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, या. दे. पाटील माध्यमिक विद्यालय, सरस्वती प्राथमिक विद्यालय, ला. ना. सार्वजनिक विद्यालय, एनसीसी बटालियन, खिरोदा येथील धनाजी नाना माध्यमिक विद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, इम्पीलियर स्कूल, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या पीजी डिप्लोमासह जळगावकरांनी अहिंसा सदभावना यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo