Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गिरणाई पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
गिरणाई पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

पाचोरा(प्रमोद सोनवणे)- येथील सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या प्रथित यश गिरणाई पतसंस्थेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 26 सप्टेंबर रविवार रोजी उत्साहात संपन्न झाली.

या सभेला सभासदांनी ऑनलाईन व ऑफलाईन उपस्थिती नोंदवली. संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब सतीश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न गिरणाई पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.गिरणाई पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष पंडितराव तात्या शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष नीरज जैन, संचालक अरूण शिंपी, ऍडव्होकेट जिवाजीराव काटकर, अनिल वाघ, रुपेश शिंदे, श्रीराम पाटील, सौ. सिंधुताई शिंदे व शैलेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील नामांकित पतसंस्थापैकी एक असलेल्या पाचोरा येथील गिरणाई पतसंस्थेचा सहकार क्षेत्रात खूप मोठा नावलौकिक आहे. यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे अध्यक्ष सतीशबापू शिंदे यांनी संस्थेच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश झोत टाकला. संस्थेचे वसूल भागभांडवल 1 कोटी 67 लाख रुपये असून 26 कोटी 29 लाख रुपयांच्या ठेवी या पतसंस्थेत आहेत. संस्थेने 21 कोटी 42 लाख रुपयांचे कर्ज वितरित केले असून या वर्षी संस्थेला 33 लाख 44 हजार रुपये नफा झालेला आहे. संस्थेची एकूण गुंतवणूक 14 कोटी 43 लाख रुपये असून थकबाकी फक्त 5 टक्के एवढी आहे.पाचोरा येथील गिरणाई पतसंस्थेच्या नवीन कार्यालयात आधुनिक लॉकर सुविधा उपलब्ध असून केवळ 9 टक्के व्याज दराने सोनेतारण कर्ज उपलब्ध आहे. संस्थेचे पाचोरा, चाळीसगाव व भडगाव येथे गोदाम उपलब्ध असून त्यावर केवळ 10 टक्के व्याज दराने माल तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. संस्थेच्या पाचोरा सह चाळीसगाव व भडगाव येथे शाखा असून सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत यशस्वीरित्या प्रगतीपथावर कार्यरत आहेत.

या संस्थेतर्फे टर्म लोन मध्ये नियमित हप्ते भरणाऱ्या व कॅश क्रेडिट कर्जा खात्यात नियमित व्याज भरणाऱ्या कर्जदारांना व्याजात 1 टक्के सूट म्हणजेच रिबेट देण्याचेव सतीश बापू शिंदे यांनी जाहीर केले. तसेच सभासदांचे गुणवंत पाल्य यांना बक्षीस व प्रशस्तिपत्रक वितरणाचा कार्यक्रम लवकरच घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. कोरोना आजाराच्या महा मारीत जगातील अनेक वित्तीय संस्था अडचणीत आल्या असल्या तरी गिरणाई पतसंस्थेच्या प्रगतीचा वेग मात्र कधीही मंदावला नाही. जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी असलेले सुप्रसिद्ध उद्योजक सतीश बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गिरणाई पतसंस्था दर वर्षी प्रगती पथाकडे वाटचाल करीत आहे.

कोविड आजारात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात झाली. संस्थेचे व्यवस्थापक पुरूषोत्तम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गाने या सभेचे ऑनलाईन व ऑफलाईन संचलन यशस्वीरीत्या केले. संस्थेचे उपाध्यक्ष नीरज मुणोत यांनी सूत्रसंचालन केले तर व्यवस्थापक पुरूषोत्तम चव्हाण यांनी आभार मानले.या सर्वसाधारण सभेच्या यशस्वीतेसाठी अनिल पवार, ईश्वर गायकवाड, संदीप देशमुख, संतोष मोरे, बबन जाधव, मच्छिंद्र पाटील, अमित नागणे, लीलाधर चौधरी, हर्षल पाटील, विकी वाडेकर, सचिन सावंत, दीपक नागणे, प्रशांत पाटील, सम्राट पाटील, महेंद्र पाटील व प्रमोद ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अन्न व्यावसायिकांचे परवाने तपासणीसाठी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम

Next Post

गिरणा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post
गिरणा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

गिरणा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d