Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
“गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !

गुलाब भाऊंचे बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषेत बंजारा गीताने केले स्वागत !

जळगाव – (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून गुलाबराव पाटील यांनी तांड्यांच्या विकासावर दिलेले हे योगदान लक्षात घेऊन, बंजारा तांडा वासियांनी ‘गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर’ म्हणजे त्यांना विजयी करण्यासाठी ठाम निर्धार व्यक्त केला आहे. “गुलाबराव पाटील हे आमचे तांड्यांचे खरे संरक्षक आहेत. त्यांच्या नेतृत्वात आमचे सर्व प्रश्न सोडवले जातील,”असा विश्वास तांडा वासियांनी व्यक्त केला.

तांड्याचा सर्वांगीण विकासासाठी दिला भरघोस निधी*
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील लोकप्रिय नेते गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध तांड्यांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले गेले आहे. मतदारसंघातील वसंतवाडी तांडा, विटनेर तांडा, रामदेव वाडी, सुभाष वाडी, लोणवाडी, मोहाडी तांडा आणि धानवड तांडा येथील पाणीपुरवठा योजना मंजूर करून तांड्यांच्या मुलभूत सोयी-सुविधा उभारण्यात त्यांचे विशेष लक्ष राहिले आहे. गुलाबराव पाटील यांनी तांड्यातील नागरिकांसाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यांनी अनेक ठिकाणी सेवालाल महाराज भवनांचे बांधकाम मंजूर करून दिले आहे. गरम पंचायत कार्यालये बांधण्यात आली आहेत, आणि पोखरी तांड्याला स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा देऊन विकासकामांना गती दिली आहे. तसेच, तांड्यांपर्यंत रस्ते उभारून बससेवा पुरविण्यात आली आहे, ज्यामुळे तांडा वासियांचे जीवन सुलभ झाले आहे.

बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषेत बंजारा गीताने केले स्वागत !

जळगाव तालुक्यातील बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत, ह्रदयाला भिडणाऱ्या बंजारा गीतांच्या माध्यमातून वसंतवाडी येथे गुलाबराव पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. बंजारा समाजाच्या महिलांनी भावपूर्ण गीतांद्वारे आपल्या नेत्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त केला पारंपरिक बंजारा वेशभूषेत साजरा झालेला हा सोहळा उत्साहवर्धक ठरला, ज्यात गुलाबराव पाटील यांच्या कार्यासाठी असलेला त्यांचा उत्साह आणि समर्थन स्पष्टपणे दिसून आले. यावेळी सदर प्रचाररॅलीत तांड्यातील युवक, महिला, आणि ज्येष्ठ नागरिक सर्वजण गुलाबराव पाटील यांच्या प्रचारात एकत्र येऊन त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत.

यावेळी त्यांच्या सोबतभाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज , मा. जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, पी.के. पाटील, सरपंच राजू भैया पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील,लोणवाडी सरपंच बाळू धाडी , अर्जुन पाटील, दशरथ चव्हाण, मांगो चव्हाण, राजाराम राठोड, जयश्री राठोड, मंगू राठोड, उदय चव्हाण, प्रेमराज चव्हाण, भिका राठोड, नवल राठोड, रविंद्र चव्हाण, गोकुळ राठोड, उखर्डू राठोड, सरीचंद राठोड, मोहाडी सरपंच डंपी सोनवणे, पंकज जाधव यांच्यासह परिसरातील महायुतीचे सरपंच , पदाधिकारी व कार्यकर्ते व तांडावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वस्तिक भजनी मंडळ परिवारातर्फे आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

Next Post

धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

Next Post
धरणगावातील,  म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo