Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट

येरवडा कारागृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार

महिला बंद्यासाठी खुली वसाहत बांधणार;  शिकागोच्या धर्तीवर मुंबईत बहुमजली इमारत बांधणार

पुणे, दि. 17 : महाराष्ट्र कारागृह विभागाचे जुन्या इमारतीत असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जागेवर नवीन कारागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट देऊन पाहणी केली. तसेच आढावा घेतला, त्यावेळी श्री वळसे पाटील बोलत होते. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक यु. टी. पवार उपस्थित होते.

गृहमंत्री श्री पाटील पुढे म्हणाले, मुंबई मध्ये शिकागोच्या धर्तीवर बहुमजली इमारत बांधण्यात येईल. आटपाडी येथे  पुरुष बंद्यासाठी खुली वसाहत आहे, त्याचप्रमाणे महिला बंद्यासाठी खुली वसाहत निर्माण करण्यात येईल. कोरोनाच्या काळात न्यायालयीन प्रकरणे जलदगतीने निपटारा होण्यासाठी बंद्याना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करावे, जेणेकरून शासनाचा बंदी न्यायालयात ने- आन करण्याचा खर्च आणि मनुष्यबळ वाचेल, असेही ते म्हणाले. यावेळी गृहमंत्री श्री वळसे पाटील यांच्या हस्ते 2019-20 सांख्यिकी पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. श्री वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

यावेळी कारागृहात कोरोनाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात रंगला फ्रेशर्स मिस फ्रेशर्स सायली तर मिस्टर फ्रेशर्स सर्वेश पाटील

Next Post

“म्युकरमायकोसिस’ ग्रस्त पाच रुग्णांना डिस्चार्ज

Next Post
“म्युकरमायकोसिस’ ग्रस्त पाच रुग्णांना डिस्चार्ज

"म्युकरमायकोसिस' ग्रस्त पाच रुग्णांना डिस्चार्ज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo