Wednesday, July 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १६ रोजी आंतरराष्ट्रीय परिषद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी अभियांत्रिकी महाविदयालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विदयापिठ, लोणेरे व इंटरनॅशनल जरनल ऑफ इनोव्हेशन्स इन इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड सायन्स यांच्या संयुक्त विदयामाने दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील संशोधक व तज्ञ, अभियंते यांना त्यांचे संशोधन मांडण्यासाठी व्यासपिठ उपलब्ध करुन देणे व चर्चा घडवून आणणे त्यानंतर परिषदेमध्ये चर्चिलेले सर्व निष्कर्ष जरनलमध्ये प्रकाशित करण्यात येतील. परिषदेमध्ये एकुण ८० संशोधकांचे संशोधन प्रकल्प सादर केले जाणार आहेत.

गोदावरी अभियांत्रिकीत आयोजित परिषदेचे उदघाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांचे हस्ते उद्या १६ रोजी होणार असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विदयापिठाचे प्रा. डॉ. डी.बी.देवसरकार यांचे बिजभाषण होणार आहे. अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे संशोधनकर्ते कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल च बेसिक सायन्सेस या विषयांमध्ये आपले संशोधन ऑनलाईन सादर करतील. संशोधन सादर करीतेवेळी तज्ञ मार्गदर्शक प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कॉम्प्युटर विषयासाठी प्रा.डॉ. मनोज ई. पाटील, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशनसाठी प्रा. डॉ. अनिल जे. पाटील, मेकॅनिकलसाठी प्रा.डॉ. ए.डी.विखार, इलेक्ट्रीकलसाठी प्रा. डॉ. किशोर भदाणे, हयुमॅनिटीज व बेसिक सायन्सेससाठी प्रा.डॉ.आर.बी. वाघुळदे यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे.

संशोधन पेपर प्राप्त

परिषदेसाठी कॉम्प्युटर विभागात २० संशोधन पेपर प्राप्त झाले असुन इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागात १०, मेकॅनिकल विभागात २५, इलेक्ट्रीकल विभागात १५ व बेसिक सायन्सेस विभागात १० संशोधन पेपर सादर केले जाणार आहेत. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅकेडेमिक डिन व परिषदेचे समन्वयक प्रा. हेमंत इंगळे व उपसमन्वयक प्रा. विजय डी. चौधरी यांनी परिषदेचे नियोजन केलेले आहे. परिषदेच्या सल्लागार समितीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकीत संशोधकांचे मार्गदर्शन लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभागाचा लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात;अडीच हजाराची मागीतली होती लाच

Next Post

राजकीय सूडभावनेच्या वादळात जनतेची होणारी गळचेपी आणि मृगजळ भासणारे ओबीसी आरक्षणाचे ग्रहण कधी सुटणार?.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo