Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 9 – शासनाने सन 2019-20 या वर्षाकरीता अपघातग्रस्त शेतक-यांस/त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक लाभ देण्याकरीता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परीस्थिती निर्माण होते. अशा कारणांनी अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2 लाख, अपघातामुळे दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय तसेच 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु. 2 लाख इतकी नुकसान भरपाई अनुज्ञेय होते. अपघातमुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु. एक लाख इतकी नुकसान भरपाई अनुज्ञेय राहील.

या योजनेत जळगाव जिल्ह्यातील सर्व वहितीधारक खातेदार, शेतकरी व विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतक-याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य (आई-वडील, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोण्तीही 1 व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकुण 2 जणांकरीता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या विमा योजनेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये 8 फेब्रुवारी रोजी लोकअदालतीचे आयोजन

Next Post

भुसावळ येथे 14 जानेवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

भुसावळ येथे 14 जानेवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo