Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चार मुलांना घेऊन विहिरीत उडी घेतली, नंतर भीती वाटली, एका मुलीसोबत बाहेर पडली, पण घडलं अघटित.

Desk Team by Desk Team
27/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

मध्य प्रदेशः नवऱ्यासोबत भांडण झाले, बायको चार मुलांना घेऊन घराबाहेर पडली. विहिरीत आत्महत्याकरण्यासाठी उडी घेतली. मात्र, नेमका विचार बदलला आणि महिला जगण्यासाठी धडपड करु लागली. ही भयानक घटना मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपुरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
घरगुती कलहानंतर ३० वर्षांची महिला तिच्या चार मुलांसह घराबाहेर पडली. त्यानंतर तिने चारही मुलांना विहिरीत ढकलून दिले व स्वतःही उडी घेतली. मात्र, त्यानंतर तिला भीती वाटली व ती विहिरीत बाहेर पडण्यासाठी धडपडत होती. त्याचवेळी तिने तिच्या मोठ्या मुलीचा हात पकडून विहिरीला लटकणाऱ्या रश्शीला पकडून विहिरीबाहेर आली. मात्र, या सगळ्यात तिच्या तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात १८ महिन्यांचा मुलगा, ३ वर्षांची आणि ५ वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपुरयेथील बालदी गावात झाली आहे. महिलेचे नाव प्रमिला भिलाला असं आहे. प्रमिलाचं पती रमेशसोबत भांडण झालं होतं. त्यानंतर तिने हे भयंकर पाऊल उचललं होतं. दरम्यान प्रमिला आणि तिची सात वर्षांची मुलगी यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.पोलिसांनी विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. तर, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, महिलेच्या कुटुंबाचीही चौकशी करण्यात येत आहे. मात्र, प्रमिला आणि तिच्या पतीमध्ये कोणत्या गोष्टीवरुन वाद सुरु होते. हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाहीये. या प्रकरणीही पोलिस अधिक चौकशी करत आहेत.दरम्यान, काही दिवसांपूर्वी बुऱ्हाणपुर जिल्ह्यातील नेपानगर येथील एकाच परिवारातील पाच लोकांनी आत्महत्या केली होती. घरामध्येच पती-पत्नीसह ३ अल्पवयीन मुलींचा मृतदेह सापडला होता. पतीने पत्नी आणि मुलांची हत्या करुन स्वतः गळफास घेत आत्महत्या केली होती. या सामूहिक आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा

Desk Team

Previous Post

आयुर्वेद उपचार विश्वसनीय आणि परिणामकारक – डॉ. हेमकांत बाविस्कर

Next Post

भाजपचं आठ नऊ वर्षातील प्रत्येक पाऊल ओबीसीविरोधी,त्यांच्याकडून ओबीसी प्रेमाची नौटंकी सुरु, हरी नरकेंचा आरोप

Next Post

भाजपचं आठ नऊ वर्षातील प्रत्येक पाऊल ओबीसीविरोधी,त्यांच्याकडून ओबीसी प्रेमाची नौटंकी सुरु, हरी नरकेंचा आरोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo