Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती शिवाजीनगर परिसरातील ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी भारावले आमदार राजूमामा, प्रचारात आघाडी…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
छत्रपती शिवाजीनगर परिसरातील ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी भारावले आमदार राजूमामा, प्रचारात आघाडी…

जळगाव – (प्रतिनिधी) – शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यावर छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दालफळ, हुडको, धनाजी काळे नगर आदी भागांमध्ये नागरिकांनी रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करीत पुष्पहार घालत हार्दिक स्वागत केले. नागरिकांचे हे प्रेम पाहून मला माझ्या कामाची पावती मिळाली, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया आ. राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी व्यक्त केली.

आ. राजूमामा भोळे यांनी रविवारी दि. १० रोजी सकाळी छत्रपती शिवाजीनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे पूजा करून प्रचार दौरा सुरू केला. तेथून अमर चौक परिसर, दालफळ, शिव मंदिर परिसर, हुडको, बौद्ध विहार परिसर, संभाजी चौक परिसर, मिर्झा चौक, धनाजी काळे नगर, पटेलवाडी, क्रांती चौक मार्गे महादेव मंदिर येथे रॅली मार्गाचा समारोप झाला. रॅली मार्गात ठिकठिकाणी महिला भगिनींनी आणि नागरिकांनी सतत फुलांचा वर्षाव करून आ. राजूमामा गोळे यांना पुष्पहार घालत औक्षण देखील केले.

मार्गातील विविध मंदिरांसह बौद्ध विहार येथे जाऊन आ. राजूमामा भोळे यांनी दर्शन घेतले. प्रचार मार्गामध्ये एका जेष्ठ भगिनीने, ‘आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे… तो आपला खरा बाप्पा (खरा माणूस)आहे…अजून विकास करजो…’ अशा ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी आ. राजूमामा भोळे भारावले.

रॅलीत महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, मंडळ क्रमांक १ चे अध्यक्ष संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू मराठे, नवनाथ दारकुंडे, शिवसेनेचे एड.दिलीप पोकळे, अमोल सांगोरे, भरत कर्डिले, सुभाष शौचे, दिनेश पुरोहित, अमजद खान पठाण, आनंद सपकाळे, संगीता पाटील, विनय चौधरी, हरीश तेली, विजय जगताप, जहांगीर खान, उमेश देशपांडे, वासिम शेख, प्रल्हाद सोनवणे, रितेश जाधव, विनय निंबाळकर, निशिकांत पाटील, कोकिळाताई पाटील, संजय सोनवणे, अनिल साठे, महेश पाटील, कल्पेश सोनवणे, मिलिंद सपकाळे, सागर पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष यामिनी सोनवणे, सरचिटणीस तारा पटेल, कविता इंगळे, लता बाविस्कर, शुभांगी बिऱ्हाडे, रेखा कुलकर्णी, गायत्री शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, योगेश कदम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राजूमामा भोळेंनी तुकाराम वाडी, जानकी नगर, कासमवाडी भागात साधला संवाद

Next Post

शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य – डॉ. अनिल काकोडकर

Next Post
शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य – डॉ. अनिल काकोडकर

शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य - डॉ. अनिल काकोडकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo