Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील 35 रुग्णांची कोरोनावर मात, बरे होऊन गेले घरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
एपीएमसी मार्केटमधील कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबिराचा 4 हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ


जिल्ह्यात आत्तापर्यंत 42 हजार 947 व्यक्तींचे
कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी करण्यात आले स्क्रिनिंग
2365 रुग्णांचे घेण्यात आले स्वॅब, 210 रुग्ण कोरोनाबाधित


जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 13 – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटरमध्ये आजपर्यंत 42 हजार 947 व्यक्तींचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रिनिंग करण्यात आले आहे. तर 2 हजार 365 रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी 1683 रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 210 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अद्याप 440 अहवाल अप्राप्त आहे. तर जिल्ह्यातील 35 कोरोना बाधित रुग्ण कोरोनावर मात करुन घरी गेले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.


जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 2505 रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले आहे तर 1688 रुग्णांना होम क्वारंटाईन केले असून 1276 रुग्णांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 210 कोरोना बाधित रुग्णांपैकी 136 रुग्णांची प्रकृती स्थिर, 11 रुग्ण अत्यावस्थ असून 35 रुग्ण बरे झाले आहे तर 28 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.


जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित सर्वाधिक 102 रुगण अमळनेर तालुक्यात आढळून आले आहे तर भुसावळ 40 रुग्ण, जळगाव शहर 39 रुग्ण, पाचोरा 20 रुग्ण, चोपडा 6 रुग्ण तर भडगाव, जळगाव ग्रामीण व दुसऱ्या जिल्ह्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन रुगण आढळून आले आहे. तसेच अमळनेर तालुक्यातील 17, भुसावळ शहरातील 9, जळगाव शहरातील 6 तर पाचोरा शहरातील 3 असे एकूण 35 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

त्याचबरोबर अमळनेर तालुक्यातील 10, भुसावळ तालुक्यातील 8, जळगाव शहरातील 4, चोपडा व पाचोऱ्यातील प्रत्येकी 3 प्रमाणे 28 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर सध्या अमळनेर तालुक्यातील 75, जळगाव शहरातील 29, भुसावळ शहरातील 23, पाचोरा शहरातील 14, चोपड्याचे 3 तर भडगाव, जळगाव ग्रामीण, व दुसऱ्या जिल्ह्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 147 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत असल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


जिल्ह्यातील नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक रहावे. लॉकडाऊनचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यंत आवश्यकता असेल तर घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करतांना सोशल डिस्टनिंगचे पालन करावे. दिवसातून चार/पाच वेळा हात साबणाने स्वच्छ धुवावे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोव्हिड-19 च्या अनुषंगाने सर्व्हे करण्यासाठी जिल्ह्यात 18 मे पासून पथक येणार आर. आर. तडवी यांची पथकाचे संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती

Next Post

बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स अँड रिटायरीज् असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पीएमकेअर फंडासाठी आर्थिक साहाय्य

Next Post

बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स अँड रिटायरीज् असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पीएमकेअर फंडासाठी आर्थिक साहाय्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d