Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना ‘या’ महिन्यापासून ६०० रुपये दराने वाळू मिळणार; वाळू मिळण्यासाठी निविदा प्रक्रिया उद्यापासून

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/05/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
६०० रुपयात एक ब्रास वाळू; ‘इथे’ करा नोंदणी….

जळगाव- नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील नागरिकांना मे महिन्यापासून ६०० रुपये दराने ब्रास वाळू उपलब्ध होईल. त्यासाठी रेती डेपो तयार करणे जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे.जिल्ह्यातील वाळू गटांच्या निविदेची प्रक्रिया २ मेपासून सुरू आहे. दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.

नागरिकांना १५ मेनंतर वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.जिल्हा प्रशासनाने वाळू संनियंत्रण समितीची बैठक नुकतीच घेतली. त्यात वाळू लिलाव व इतर बाबींचे धोरण ठरविले आहे. वाळू गटांच्या लिलावाची प्रकिया २ मेपासून सुरू होणार आहे. प्रत्येक तालुक्यात वाळू डेपो तयार करण्यात येणार आहे.जून २०२२ पासून जिल्ह्यात वाळू उपसा बंद आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्याने विविध ठिकाणच्या नद्यांमध्ये वाळूचा मोठा साठा झाला आहे. राज्यस्तरीय पर्यावरण समितीने वाळू गटांच्या लिलावाला मंजुरी दिली आहे.सोबतच राज्य शासनाने वाळू सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात देण्याचे धोरण निश्चित केल्याने वाळू लिलावाची प्रक्रिया सहा महिन्यांपासून रखडली होती. आता राज्य शासनानेच वाळूचे दर सहाशे रुपये ब्रास जाहीर केले आहेत.

प्रत्येक तालुक्यात वाळू डेपो कंत्राटदाराला देण्यात येईल. कंत्राटदार वाळू गटांपासून, तर वाळू डेपोपर्यंत वाळू काढून आणेल. नागरिकांकडून वाळूची मागणी होईल, तेव्हा तो त्यानेच प्रमाणित केलेल्या डंपर, ट्रॅक्टरमधून वाळू पाठविली जाईल.जो खर्च त्याला येईल, त्यातून वाळूचा दर सहाशे रुपयांप्रमाणे नागरिकांकडून घेतला जाईल. खर्चाची उर्वरित रक्कम संबंधित कंत्राटदाराला शासन देणार आहे. शासकीय कामासाठी वाळू राखीव ठेवण्यासाठी काही गट आरक्षित करण्यात येणार आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

MPSC च्या उमेदवारांची संख्येचा विक्रम मोडणारी परीक्षा; साडे चार लाखांपेक्षा जास्त उमेदवार राहिले हजर

Next Post

जिल्ह्यातील ‘इतक्या’ लाभार्थ्यांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ…

Next Post
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून माजी सैनिक पाल्यांना अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील 'इतक्या' लाभार्थ्यांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo