Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात दहा हजारांवर अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात; रुग्ण बरा होण्याचा दर वाढला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जामनेर(प्रतिनिधी)- तालुक्यात दुसऱ्या लाटेत शहरी व ग्रामीण भागात लग्न समारंभ, अंत्ययात्रा, दारावर जाण्याची प्रथा, बाजार इ. कोवीड नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोना चा संसर्ग झपाट्याने वाढला. पहिल्या लाटेपेक्षा तो अधिक होता. सुरुवातीला शहरी भागात व नंतर ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून आले. तालुक्यात एकूण ११०७९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले पैकी १०७९५ बरे झाले तर १४५ रुग्णांचा मृत्यू झाला. १३९ रुग्ण हे सध्या उपचाराखाली आहेत. दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण हे अधिक होते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मृत्यु अधिक झाले. तालुक्याचा बरे होण्याचा दर हा ९४.१६% असून पॉझिटिव्हीटी दर २% खाली आला आहे. मृत्यू दर हा १.३१ इतका आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संचारबंदी व लॉक डाऊन च्या काळात मुख्यधिकारी राहुल पाटील व पोलीस निरीक्षक जामनेर प्रताप इंगळे, पहूर पो.स्टे.पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी राबविलेल्या कडक कारवाईच्या सत्रामुळे, रिकामटेकडे फिरणाऱ्यांवर ठेवलेला चाप तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केलेल्या नियोजनानुसार वैद्यकीय अधिकारी, समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक यांनी प्रत्येक गाव गावात जाऊन कोरोना टेस्टिंग चे कॅम्प चे आयोजन करण्यात आले.यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास तात्काळ ग्रामपंचायतीला कळवून त्याला होमकोरंटाईन चा सल्ला देण्यात आला. तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या मदतीने प्रत्येक गावात “माझे कुटुंब माझी जबाबदारी”या मोहिमेची प्रभावीपणे अंबालबजावणी करून संशयीत शोधून काढले. तसेच बधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. त्याचप्रमाणे तालुक्यात तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या निर्देशानुसार कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास मृतांच्या परिवारातील सदस्यांच्या व त्याच्या संपर्कातील नागरिकांच्या ४८ तासाच्या आत कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ग्रामीण भागाच्या आरोग्य यंत्रणेने व जामनेर नगरपालिकेने अधिकाधिक चाचण्या केल्या तर वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.आर.के.पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.जितेंद्र वानखेडे यांनी व जामनेर-पहुर च्या सर्व स्टाफ नर्स,आरोग्य सेविका,वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी यांनी एकत्रित मिळून अत्यवस्थ रुग्णांवर योग्य उपचार व सेवा करून मृत्यू दर कमी ठेवला. यानंतर ही मास्क,वारंवार हात धुणे,एकमेकांपासून अंतर ठेवणे, गर्दी न करणे व आपली पाळी आल्यानंतर लसीकरण करून घेतल्यास पुढील येणारी तिसरी कोरोना ची लाट टाळू शकतो.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तृतीयपंथी, माध्यम छायाचित्रकारांना महिनाभराचा किराणा भेट

Next Post

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

Next Post
अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.