Wednesday, July 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना आय.एस.ओ. दर्जा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
जामनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना आय.एस.ओ. दर्जा

जळगाव –(प्रतिनिधी) – जिल्हा परिषद, जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात “पंचायत राज समृद्ध ग्रामपंचायत अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या आय.एस.ओ. ग्रामपंचायत मोहिमेत जामनेर तालुक्यातील तब्बल 24 ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी करत आय.एस.ओ. दर्जा प्राप्त केला आहे. या साठी जामनेर येथील गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

जामनेर तालुक्यातील आय.एस.ओ. दर्जा प्राप्त ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत –
फत्तेपूर, लोंढरी, मेनगाव, टाकळी, गारखेडा, हिवरखेडा, पळसखेडा, निमखेडी पिंप्री, बेटावद, एकुलती, चिंचोली, पळसखेडा प्र.न., लोणी, हिंगणे, पिंपळगाव गोलाईत, मादणी, सवतखेडे, सुनसगाव, कोदोली, ओझरखेड, पहूर पेठ, नेरी, गाडेगाव व वाकी.

या ग्रामपंचायतींनी प्रशासनिक कामकाज, पारदर्शकता, नागरिकाभिमुख सेवा, स्वच्छता, हरित उपक्रम, डिजिटल व्यवहार आणि सामाजिक उपक्रम आदी क्षेत्रांत आदर्शवत कामगिरी करून ग्रामविकासाची नवी दिशा दाखवली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की, “समृद्ध आणि आत्मनिर्भर ग्रामपंचायत घडविणे हेच पंचायत राज व्यवस्थेचे खरे बळ आहे. जामनेर तालुक्यातील या 24 ग्रामपंचायतींनी संपूर्ण जिल्ह्यासमोर आदर्श निर्माण केला असून, इतर ग्रामपंचायतींनीही त्यांचा आदर्श घेत पुढाकार घ्यावा.”

जिल्हा परिषदेच्या या अभियानामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजात गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेस नवे परिमाण लाभले असून, ग्रामपंचायत प्रशासनातील जनविश्वास अधिक वृद्धिंगत झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“जळगाव पॅटर्न”चा राज्यभर विस्तार – सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना

Next Post

अपंग कल्याण निधी गैरवापर प्रकरणात लोहारा सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांना मोठा दिलासा! ग्रामविकास मंत्र्यांकडून अपात्रतेचा निकाल रद्द

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo