Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर निधीच्या खर्चाचे योग्य नियोजन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

पुणे जिल्ह्यासाठी सन २०२१-२२ च्या ६९५ कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता 

पुणे, दि. 16 : उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2020-21 मधील माहे मार्च 2021 अखेर झालेल्या खर्चास तसेच पुणे जिल्ह्यासाठी सन  2021-22 च्या 695.00 कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सन 2020-21 मधील माहे मार्च 2021 अखेर झालेल्या खर्चास तसेच पुणे जिल्ह्यासाठी सन 2021-22 च्या रूपये 128.93 कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. अनुसूचित जमाती उपयोजनेंतर्गत सन 2020-21 मधील माहे मार्च,2021 अखेर झालेल्या खर्चास तसेच पुणे जिल्ह्यासाठी सन 2021-22च्या 44.38 कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा  वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर निधीच्या खर्चाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणेला दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, खासदार सुप्रिया सुळे, गिरीश बापट, आमदार दिलीप मोहिते, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार संग्राम थोपटे, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार संजय जगताप, आमदार अतुल बेनके, आमदार सुनिल शेळके, आमदार सुनिल टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे,आमदार शरद रणपिसे तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हाणाले, मंजूर निधी प्रस्तावित योजनांसाठी वेळेत खर्च करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी प्राधान्य द्यावे तसेच कोरोनासाठीच्या उपाययोजना व आवश्यक सुविधांसाठी तीस टक्के निधी खर्च करण्याचे यापूर्वीच निर्देश देण्यात आले होते, त्याप्रमाणे नियोजन करावे, असे त्यांनी त्यांनी सांगितले.

या बैठकीत 25 जानेवारी 2021 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तावरील मुद्यांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 चा माहे मार्च 2021 अखेर झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, जिल्हा वार्षिक योजना, सन 2021-22 चा अर्थसंकल्पित आराखडा यांसह जिल्हा नियोजन समितीशी सबंधित महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यावेळी नियोजन समिती बैठकीत लोकप्रतिनिधी आणि समिती सदस्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भूजल संपत्तीचे जतन व संवर्धन होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

Next Post
महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d