Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली लोकशाहीच्या बळकटीकरणाची शपथ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली लोकशाहीच्या बळकटीकरणाची शपथ

जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :- ‘आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो, की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’, अशी शपथ आज शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. निमित्त होते, राष्ट्रीय मतदार दिवसाचे.

            25 जानेवारी, 1950 हा दिवस भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्त हा दिवस देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असा भारत निवडणूक आयोगाचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर दहाव्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

            यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पाटोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे आदि उपस्थित होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. हुलवळे यांनी शपथेचे वाचन केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यास मदत होणार- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

Next Post
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d