Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात भरडधान्य नोंदणी व खरेदीकरीता 15 खरेदी केंद्र सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 15 :- जिल्ह्यात खरीप पणन हंगाम 2019-20 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरडधान्य (ज्वारी, बाजरी व मका) खरेदीकरीता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बिगर आदिवासी क्षेत्रात 15 खरेदी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. सदरच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी खरेदीसाठी ऑनलाईन नोंद करावयाची आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी चालु वर्षाचा ऑनलाईन 7/12 उतारा, आधार कार्डची झेरॉक्स व बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकची झेरॉक्स सादर करावयाची आहे. शेतकरी नोंदणी 1 नोव्हेंबर, 2019 पासून सुरु झालेली असून नोंदणी व खरेदीची अंतिम मुदत 31 डिसेंबर, 2019 पर्यंत आहे. सन 2019-20 च्या खरीप पणन हंगामात हायब्रीड ज्वारी रुपये 2550/- मालदांडी ज्वारी रु. 2570/-, बाजारी रु. 2000/- व मका रु. 1760/- असा हमीभाव शासनाने निश्चित केलेला असुन सदरचा हमीभाव हा एफ.ए.क्यु. दर्जाच्या धान्याकरिता आहे. ज्यामध्ये न डागाळलेला, स्वच्छ प्रतिचा व 14 टक्क्यापर्यंत आद्रता असलेला माल खरेदी करण्यात येईल.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन श्री. परिमल साळुंखे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

Next Post

संविधान जागर समिती तर्फे संविधान दिना निमित्त बैठकीचे आयोजन

Next Post

संविधान जागर समिती तर्फे संविधान दिना निमित्त बैठकीचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo