Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात लसीकरणाचा उच्चांक : एकाच दिवशी 77 हजार 513 लाभार्थ्यांचे लसीकरण; आतापर्यंत 14 लाख 7 हजार 163 लाभार्थ्यांना दिली लस

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात लसीकरणाचा उच्चांक : एकाच दिवशी 77 हजार 513 लाभार्थ्यांचे लसीकरण; आतापर्यंत 14 लाख 7 हजार 163 लाभार्थ्यांना दिली लस

जळगाव(जिमाका)- कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात लसीकरणाला वेग आला असून बुधवारी (1 सप्टेंबर) एकाच दिवशी तब्बल 77 हजार 513 नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले. जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसीच्या मात्रेनुसार आतापर्यंत 14 लाख 7 हजार 163 लाभार्थ्यांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पहिल्या लाटेनंतर आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण करण्यात येत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस महत्वपूर्ण असल्याने जिल्ह्यात लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाला दर तीन/चार दिवसानंतर लसीची पुरेशी मात्रा उपलब्ध होत आहे. त्यानुसार दर दिवशी प्रत्येक केंद्रावर हजारो नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात लसीकरणास गती मिळाली असून ऑगस्ट महिन्यातच पावणे दोन लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या लसीच्या मात्रेनुसार शहरी भागात 6 लाख 34 हजार 552 तर ग्रामीण पातळीवर 7 लाख 72 हजार 611 असे एकूण 14 लाख 7 हजार 163 लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. विशेषत: शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात 1 लाख 38 हजारांहून अधिक संख्येने लसीकरण झाले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हाच उपाय असून जिल्ह्यात लसीचा पुरवठा नियमित याच प्रमाणात अखंड राहिल्यास लसीकरणाला गती मिळून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी म्हटले आहे.

प्रतिदिन 1 लाख लसीकरणाचे प्रशासनाचे उद्दीष्ट

सद्य:स्थितीत संसर्ग साखळी खंडीत झाली असून जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण देखील पूर्णपणे बरे झालेले आहेत. आगामी काळात संसर्ग वाढू नये अथवा संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त लसीचा पुरवठा वाढविण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध होत असून लसीच्या उपलब्धतेनुसार दर दिवशी प्रत्येक केंद्रावर 1 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीचा पुरवठा याचप्रमाणे प्राप्त झाल्यास प्रतिदिन 1 लाख लसीकरणाचे प्रशासनाने उद्दीष्ट आहे. पुढील दोन ते अडीच महिन्यांत जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करु शकू असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात क्रांती आणावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post

प्रहार जनशक्ती पक्षाच्या जामनेर तालुकाध्यक्षपदी प्रदीप गायके यांची नियुक्ती तर विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज कुमार महाले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d