Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

▪️ मतदान केंद्रावरील टीमला प्रत्येक टप्यासाठी पाच वेळा मार्गदर्शक संदेश

▪️ अकरा विधानसभेसाठी 11,762 ईव्हीएम त्यातील फक्त्त 79 बदलावे लागले

▪️ मतदार यादी अपडेटमुळे किरकोळ तक्रारी ; सी – व्हिझीलच्या 275 तक्रारी निकाली

जळगाव – ( माध्यम कक्ष )- जिल्ह्यात निवडणूक यंत्रणेनी सूक्ष्म नियोजन केल्यामुळे मतदान सुरळीत पार पडले. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात एकूण 11,762 बॅलेट युनिट वापरण्यात आले त्यातील फक्त्त 79 यंत्र बदलावी लागली. मतदार यादी अपडेटमुळे यावेळी एकही तक्तार आली नाही अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

नियोजनासाठी पाच संदेश ठरले प्रभावी
मतदान केंद्रावरील टीमला जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून वेगवेगळ्या टप्यात पाच मेसेज देण्यात आले.
त्यातला पहिला संदेश सकाळी 90 मिनिटापूर्वी करायच्या कामाच्या सूचना त्यात मतदान प्रतिनिधीची नियुक्तीपत्र, त्यांची मूळ स्वाक्षरी व इपिकची खात्री करूनच त्यांना प्रवेश द्यावा. सकाळी 90 मिनिटच्या अगोदर
बॅलेट युनिट जोडून ठेवावे. 90 मिनिटे अगोदर अभिरूप मतदान सुरु करावे. मतदान सुरु झाल्यानंतर करावयाच्या कामाच्या सूचना त्यात स्थलांतरीत व मयत मतदारांची यादीमध्ये नाव असलेल्या मतदाराची ओळख स्वतः मतदान केंद्राध्यक्ष यांनी करून घ्यावी. सायंकाळी 6 वाजता उपस्थित मतदारांना उलट्या क्रमाने चिठ्या द्याव्या.

मतदार यादी अपडेटमुळे नगण्य तक्रारी
मतदार यादीत स्थलांतरीत आणि मयत यांचे नाव वगळून 1 लाख 43 हजार नवीन मतदाराची नोंद करण्यात आली. त्यामुळे फारशा तक्रारी आल्या नसल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मतदान केंद्रावर सुविधा
मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अधिकाधिक सुविधा देण्यात आल्या होत्या. आरोग्याच्या सुविधेमुळे 25 ठिकाणी रुग्णावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

अल्पबचत भवन मधील वेबकास्टिंगवरून नियंत्रण
11 विधानसभा मतदार संघात एकूण 3683 मतदान केंद्र पैकी 2965 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात आले, म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक मतदान केंद्रातून वेबकास्टिंग करण्यात आली. राज्यात सर्वाधिक वेबकास्टिंग जळगाव जिल्ह्यात करण्यात आली. याचे नियंत्रण अल्पबचत भवन मध्ये करण्यात आले. या ठिकाणी जिल्हानिवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, निवडणूक आयोगाच्या सामान्य निरीक्षक यांचे बारकाईने लक्ष देऊन त्रुटी दुर केल्या.

सी व्हिजील अँपवरील संपूर्ण तक्रारीचे निवारण
या ॲपवर एकूण 275 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर जिल्ह्यातील 1950 कॉल सेंटरवर 879 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता लागू झाल्यापासून आचारसंहिता भंगाशी संबंधित तक्रारी करण्यासाठी सी व्हिजिल अँप कार्यान्वित करण्यात आले होते. या ॲप वर विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाशी संबंधित तक्रारी प्राप्त होत होत्या. जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातून एकूण 275 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्या. सी व्हिजिल या ॲपवर प्राप्त तक्रारींमध्ये चोपडा विधानसभा मतदारसंघातून 04, रावेर विधानसभा मतदार संघातून 01, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 05, जळगांव शहर विधानसभा मतदार संघातून 21, जळगाव ग्रामीण मतदार संघातून 04, अमळनेर मतदार संघातून 14, चाळीसगाव मतदार संघातून 71, पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 49, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 10, तर सर्वाधिक मुक्ताईनगर मतदारसंघातून 89 अशा एकूण 268 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीचे दखल घेत तात्काळ या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्याआहेत. जळगाव जिल्ह्यात आचारसंहिता भंगासदर्भात तसेच निवडणुकीच्या कालावधीत येणाऱ्या अडचणी संदर्भात तक्रारी करण्यासाठी अकरा विधानसभा मतदारसंघातून 1950 हा नंबर देण्यात आला होता. यावर मतदानाच्या दिवसापर्यंत 879 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारींचे दखल घेऊन या तक्रारींचे देखील निराकरण जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सायकळी ५ वाजे पर्यंत मतदानाची टक्केवारी

Next Post

इलेक्शन ड्युटी आटोपून घरी जातांना मोटारसायकल अपघातात शिक्षकाचे निधन;जिल्हा प्रशासनाकडून शोक व्यक्त

Next Post
इलेक्शन ड्युटी आटोपून घरी जातांना मोटारसायकल अपघातात शिक्षकाचे निधन;जिल्हा प्रशासनाकडून  शोक व्यक्त

इलेक्शन ड्युटी आटोपून घरी जातांना मोटारसायकल अपघातात शिक्षकाचे निधन;जिल्हा प्रशासनाकडून शोक व्यक्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d