Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात हर घर जल उत्सव मोहीम;उपक्रमात सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात हर घर जल उत्सव मोहीम;उपक्रमात सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांचे आवाहन

जळगाव दि 26(प्रतिनिधी): जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात “हर घर जल उत्सव” विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या अंतर्गत 15 ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.

जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे.या कार्यक्रमांतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणी द्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन शुद्ध आणि शाश्वत पाणीपुरवठा होण्यासाठी ही योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या भागीदारीतून राबवली जात आहे.

या योजनेत 100% वैयक्तिक आणि संस्थात्मक नळ जोडणी पूर्ण करणाऱ्या गावांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.याबाबत शासनाच्या सूचनेनुसार विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात ग्रामपंचायत ‘हर घर जल’ घोषित करण्याचा ठराव करणे,गावात ‘हर घर जल उतसव’ साजरा करणे, विद्यार्थ्यांची रॅली काढणे, जनजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करणे,लोककलांचा वापर करून जनजागृती करणे, पाणी गुणवत्ता तपासणीसाठी विशेष मोहीम राबवणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.तसेच उत्सवांमध्ये गावातील पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा,अंगणवाडी,आरोग्य केंद्र इत्यादी सर्व घटकांना सहभागी करून घेणे आदी उपक्रम राबवणे बाबत सूचना आहेत.हा उपक्रम राबविण्याबाबत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षा तर्फे तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया आणि जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक स्नेहा कुडचे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सीआयएससीई बोर्डाच्या परिक्षेत देशातून अनुभूतीची रितीका देवडा तृतीय

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० रोजी “नाट्य संगीत रजनी” कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० रोजी "नाट्य संगीत रजनी" कार्यक्रमाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo