Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे क्रीडा महोत्सव उत्साहात

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/12/2023
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे क्रीडा महोत्सव उत्साहात

जळगाव, ;- विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासही तितकाच महत्त्वाचा असतो. या अनुषंगाने दरवर्षाप्रमाणे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांसाठी “क्रीडा महोत्सवाचे” आयोजन केले. ता. २१ शुक्रवार रोजी हा क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक व महिला पोलीस प्रशिक्षक जागृती काळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या क्रीडा महोत्सवाला प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या उपस्थित होत्या.

यावेळी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्कूलचे क्रीडाशिक्षक संजय चव्हाण यांच्या वतीने सर्व विद्यार्थी, पालक यांना खेळाची प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमातील विशेष म्हणजे अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांनी केलेल्या मार्चपास्टने सर्वांचे लक्ष आकर्षित केले. यावेळी विविध खेळामध्ये सहभागी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या कि, अशा क्रीडा कार्यक्रमांच्या माध्यमातून उद्याचे उत्कृष्ठ खेळाडू घडण्यास मदत मिळते व या माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्यांला आपला खेळ सादर करण्याची संधी मिळावी हाच या आयोजनामागचा हेतू असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी तर सांगितल्याच त्याचबरोबर मैदानावर विविध खेळ खेळा. निरोगी राहा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. यानंतर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी, आपल्या लहान मुलांबरोबर स्वतः पालकांनी त्यांच्या खेळांमध्ये सहभागी होऊन त्यांना खेळासाठी प्रोत्साहित करावे असे नमूद केले. क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक स्पर्धांमध्ये स्कूलच्या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत गगन भरारी घेतली. यावेळी सांघिक खेळ आणि मैदानी खेळ यातील अनेक स्पर्धा भरवण्यात आल्या यात विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, बॅटमिंटन, कॅरम, चेस, टग ऑफ वार तसेच यामध्ये विविध अंतरांच्या धावण्याच्या शर्यतींचा समावेश होता त्यात माँटेसरीच्या चिमुकल्यांनी देखील सहभाग घेतला. या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी स्कूलचे व्यवस्थापक प्रशांत महाशब्दे यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी आदींसह पालक व स्कूल कमिटी सदस्य यांचे मागदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Team Satymev Jayate

Tags: Celebration of “Annual Sports Festival” at H. Raisoni Public School
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी नीती आणि प्रशासकीय धोरणांची आधुनिक युगातील प्रासंगिकतावर चर्चासत्र

Next Post

आईच्या अस्थी विसर्जन न करता राखेत शेतात पेरुचे झाड लावून दिला अनोखा संदेश

Next Post
आईच्या अस्थी विसर्जन न करता राखेत शेतात पेरुचे झाड लावून दिला अनोखा संदेश

आईच्या अस्थी विसर्जन न करता राखेत शेतात पेरुचे झाड लावून दिला अनोखा संदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.