Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जी.एच.रायसोनी महाविद्यालयात “राष्ट्रीय मॅनेजमेंट गेम” स्पर्धेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगावात प्रथमच “राष्ट्रीय मॅनेजमेंट गेम” स्पर्धेचे आयोजन
गेम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार बिझनेस चे धडे

जळगाव  प्रतिनिधी – जी.एच.रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबवित असते या अनुषंगाने प्रथमच ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन व चाणक्य आयोजत 23 व्या स्टुडंट मॅनेजमेंट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेची प्राथमिक फेरी जी.एच.रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात होणार आहे. व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाला चालना देण्यासाठी मागील 22 वर्षापासून आयमा व चाणक्य यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली, चेन्नई, कोईम्बतूर, बँगलोर,पुणे, नवसारी या प्रगत शहरामध्ये मागील 22 वर्षापासून स्टुडंट मॅनेजमेंट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात यायचे. परंतु यावेळी प्रथमच जळगांव शहरातील सुपरिचित जी.एच.रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाला या स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाल्याने महाविद्यालयाच्या लौकिकात पुन्हा भर पडली आहे. 22,23,24 ऑक्टोबरला सदर महाविद्यालयात या राष्ट्रीय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तीन ते चार विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याची संधी खान्देशातील स्थानिक विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार आहे. तसेच या स्पर्धेत चाणक्य या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांना वास्तविक जगातील बिजनेसच्या परिस्थिती दिल्या जातील. त्या परिस्थितीमध्ये स्पर्धकांना बिजनेस रिलेटेड निर्णय घ्यावे लागतील. उदा. उद्योगात कच्चा मालाचा कमी वापर, जाहीरातींवर कमी अधिक खर्च, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर, ग्राहकांच्या अपेक्षा व आदी निर्णयाचा परिणाम त्यांच्या बिजनेसवर कसा होतो हे त्यांना चाणक्य सॉफ्टवेअरद्वारा कळेल तसेच त्यांनी स्पर्धेमध्ये घेतलेल्या निर्णयाचा परिणाम त्यांच्या बिजनेसच्या मार्केटींग विभाग, फायनान्स विभाग, एच.आर. ऑपरेशनवर देखील कसा होतो हे त्यांच्या लक्षात येणार आहे.
या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना उद्योजकता निर्माण करणे, नेतृत्व कौशल्य तसेच निर्णय क्षमता वाढवणे आदी बाबी लक्षात येतात. त्यामुळे बिजनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेविषयी मोठे आकर्षण असते. पहिल्यांदाच जळगांव शहरात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेच्या नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे असे रायसोनी इंन्टिट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सागितले. सदर प्राथमिक फेरीतील विजेत्यांची तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे ता. 30 नोव्हें रोजी अंतिम फेरी होणार आहे. याठिकाणी प्रथम विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना रनरअप ट्रॉफी व हिरो मोटरबाईक आणि द्वितीय विजयी ठरलेल्या स्पर्धकांना रनरअप ट्रॉफी व रोख रक्कम 30,000 रुपये तर तृतीय ठरलेल्या स्पर्धकांना रनरअप ट्रॉफी व रोख रक्कम 20,000 रुपये पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी रायसोनी महाविद्यालयातील प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे यांच्या 9850628305, 9503067117 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रायसोनी इन्स्टिट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जनतेच्या प्रेमाच्या शिदोरीवर विजयाची श्वाश्वती- मा. आ. दिलीपभाऊ वाघजेष्ठांनी दिला आर्शिवाद- विजयी भव!

Next Post

दिलीपभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बोदर्डे गावातील पदाधिकाऱ्यां समवेत कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

दिलीपभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बोदर्डे गावातील पदाधिकाऱ्यां समवेत कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo