Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन धर्म ही एक आचरण प्रणाली -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
जैन धर्म ही एक आचरण प्रणाली -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे(प्रतिनिधी)- जैन धर्म ही एक आचरण प्रणाली असून नागरिकांना जीवन जगतांना आदर्श आचरण करण्याची शिकवण देतो, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाच्या प्रमुख प्रा.डॉ. विमल बाफना लिखित सातवा आगमग्रंथ ‘उवासगदसाओ’ चे मराठी भाषांतर ‘उपासकदशा’आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव प्रफुल्ल पवार, जैन स्टडीजचे अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, अखिल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, लेखकांनी जैन धर्मातील तत्वे या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी भाषेत समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन भाषेतील साहित्याचे सर्वसामान्य नागरिकांना कळेल अशा स्वरुपात लेखन केल्यास देशाचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती नागरिकांना समजण्यास मदत होईल. भगवान महावीर यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, स्वादरसंतोष, इच्छापरिमाण ही तत्वे सांगितली. आजच्या युगात त्याचे अनुकरण करुन जीवन जगणे काळाची गरज आहे.

या तत्वांचे अनुसरण करीत जैनधर्म नेहमीच संकटाच्यावेळी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो असेही ते म्हणाले. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. करमळकर म्हणाले, विद्यापीठात एकूण १७ अध्यासने आहेत. अध्यासनाच्यावतीने अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने संशोधनात्मक कामकाज होत आहे. डॉ. बाफना यांनी ग्रंथाच्या मराठी आवृत्तीविषयी माहिती दिली.

Team Satymev Jayate

Previous Post

शकुंतला टोके यांचे दुःखद निधन

Next Post

अखिल भारतीय युवक महासंघाच्या जळगाव महानगर प्रमुख पदी विशाल सपकाळे

Next Post
अखिल भारतीय युवक महासंघाच्या जळगाव महानगर प्रमुख पदी विशाल सपकाळे

अखिल भारतीय युवक महासंघाच्या जळगाव महानगर प्रमुख पदी विशाल सपकाळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo