Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव – डॉ. एच. पी. सिंग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/12/2024
in जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव -(प्रतिनिधी )- कृषीक्षेत्रातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि महोत्सव हे चांगले माध्यम आहे. भारतासह जगात अनेक ठिकाणी महोत्सवाचा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणण्यासाठी प्रभावीपणे वापर केला जातो. त्यातही प्रत्यक्ष अनुभूती देणारे जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार हे जगातील एकमेव कृषिमहोत्सव आहे. एकाच छताखाली जमिनीच्या मशागती पासून ते काढणी पर्यंत, काढणी पश्चात विक्री व्यवस्था, जल व मृद संधारण, अत्याधुनिक ठिबक सिंचन, फर्टिगेशन पद्धती, जैन ऑटोमेशन, रोपांची निर्मिती व लागवड प्रक्रिया, फ्युचर फार्मिंग म्हणजेच भविष्यातील शेतील, स्मार्ट अॅग्रीकल्चर याबाबत समजेल. शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या या महोत्सवात शेतकऱ्यांसह प्रत्येकाने यावे, तंत्रज्ञान बघावे ते आत्मसात करावे आणि प्रसारीत करावे जेणे करून उत्पादकता वाढविता येईल. आधुनिक शेतीचा अवलंब करुन सकारात्मक बदल घडविता येतो असे हॉर्टिकल्चर फलोद्यान माजी आयुक्त तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR)चे माजी डी.जी.जी डॉ.एच.पी.सिंह  यांनी केले.

जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषिमहोत्सवाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या सोबत सौ. बिमला सिंग, जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, डॉ.  बि. के. यादव, कृषी संशोधन विभागाचे संजय सोन्नजे उपस्थित होते.

हळद, आले, लसूण, कांदा, मिरची या मसाल्यापिकांसह टॉमोटो, बटाटा पिकांसह पपई, केळी, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पेरू, सिताफल, लिंबू या फळ बागांमध्ये ठिबक व स्प्रिंकलर्स चा वापर यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. शाश्वत निर्यातक्षम उत्पादन केल्यामुळे योग्य भाव कसा मिळेल यासाठी फक्त मार्गदर्शन नाही तर प्रत्यक्ष सल्ला त्यासाठी तज्ज्ञांची सुयोग्य मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे. येथील तंत्रज्ञान पहावे, अनुभवावे, आपल्याजवळील काही संशोधणात्मक अनुभव असतील ते एकमेकांना सांगावे व गावांगावामध्ये जावून त्याचा प्रसार करावे असे आवाहनही डॉ. एच. पि. सिंग यांनी केले.

या कृषिमहोत्ससाठी मसाले पिकांचे प्रात्यक्षिक आहे. त्यात हिंग, लवंग, जायफळ, तेजपान, कापूर, कढीपत्ता, दालचिनी, मिरी, आले, हळद, लसुण, कांदा, मिरची, जिरे, धने यांचा समावेश आहे. यामध्ये १९ प्रकाराचे हळद, सात प्रकारचे लसूण आपल्याला पाहता येतील. कमी जागेत, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढेल यासाठी हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी चैतन्यदायी ठरेल.

कॅप्शन –  जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषि महोत्सवाच्या भेटीप्रसंगी डावीकडून डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. बि.के यादव, डॉ. के. बी. पाटील, सौ. बिमला सिंग, डॉ. एच. पी. सिंग, डॉ. अनिल ढाके, संजय सोन्नजे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र गोसेवा अध्यक्ष शेखरजी मुंदडा (राज्यमंत्री दर्जा ) यांचा 15 डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौरा

Next Post

गोदावरी नर्सिंगच्या एएनएम द्वितीय वर्षाचा उत्कृष्ट निकाल

Next Post
गोदावरी नर्सिंगच्या एएनएम द्वितीय वर्षाचा उत्कृष्ट निकाल

गोदावरी नर्सिंगच्या एएनएम द्वितीय वर्षाचा उत्कृष्ट निकाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo