Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“टीमवर्क हीच मॅनेजमेंट क्षेत्रातील “सक्सेस कि “- निलांबरी जोशी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
“टीमवर्क हीच मॅनेजमेंट क्षेत्रातील “सक्सेस कि “- निलांबरी जोशी

 जळगाव-(प्रतिनिधी) – माणसाच्या व्यक्तिमत्वाचे अनेकविध पैलू आज  आपल्याला बघावयास मिळतात. टीमवर्क असो की कुठलेही क्षेत्र खेळीमेळीने व मोठा विचार आत्मसात करून केलेले काम हीच  “सक्सेस कि” आहे असे विचार, कॉर्पोरेट व सुप्रसिद्ध लेखिका  नीलांबरी जोशी यांनी केसीई सोसायटीच्या आय. एम. आर.इंस्टिट्यूट येथे आयोजित “औद्योगीक नेतृत्व आणि संघटित मानसिकता” या  व्याख्यानात केले. केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्तं या व्याख्यानाचे आयोजन आय.एम. आर.ला केले होते. 

यावेळी व्यासपीठावर के.सी.ई. सोसायटीचे सन्माननीय सहसचिव प्रमोद पाटील, आय.एम. आर च्या  संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे उपस्थित होते.

पुढे बोलताना त्या म्हटल्या की, आज उद्योग क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला पाहावयास मिळतात यात काही मितभाषी तर काही बोलक्या स्वभावाचे आहेत असे जरी स्वभावाचे पैलू असले तरी आज प्रत्येकाने त्याच्या अनुभव व कौशल्याचा वापर करीत प्रतिकूल परिस्थितीतून सुरू केलेला व्यवसाय आज उच्च स्तरावर नेऊन ठेवला आहे याचे गमक केवळ सर्वांविषयी असलेली  सहकार्याची भावना हे आहे, यात शंका नाही. जीवनात तुम्हाला उद्योग क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची तसेच बदलत्या काळानुसार स्वतः बदल घडवून  आणणे तितकेच महत्वाचे आहे. या क्षेत्रात यशाची उंच भरारी तुम्ही नक्की गाठू शकाल, असे विचार त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना मांडले यावेळी त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगात उद्योजकांचे व्यक्तिमत्व कसे घडले याविषयी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात शिल्पा बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, टीमवर्क करताना ते टिमवर्क मर्यादित न ठेवता त्याचा आवाका वाढवल्यास व्यक्तिमत्व विकासला अनेकविध पैलू पडतात. टीम बिल्डिंग आणि लीडरशिप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने या क्षेत्रात करियर करायचे असल्यास स्वतःला सिद्ध करावे लागेल. असे त्या म्हटल्या..या कार्यक्रमाला उद्योजक म्हणून रोटरीचे कॅप्टन मोहन कुलकर्णी, अमित साखला, रोहित पोतदार, गोकुळ संघवी, संगीता अट्रावलकर, डॉ. वायकोळे, संदीप शर्मा रोटरीचे सचिव विजय काबरा, उद्योजक किशोर देशमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी  उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. शमा सराफ यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यार्थ्यांनी लुटला देशी खेळ खेळण्याचा आनंद;संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा उपक्रम

Next Post

महालोक अदालतीत 372 प्रकरणी तडजोड ; 24 लक्ष 79 हजाराचा भरणा

Next Post
महालोक अदालतीत  372 प्रकरणी तडजोड ; 24 लक्ष 79 हजाराचा भरणा

महालोक अदालतीत 372 प्रकरणी तडजोड ; 24 लक्ष 79 हजाराचा भरणा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo