Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ठराविक उद्योगांना परवानगी; पण जिल्हाबंदी कायम – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई – (प्रतिनीधी) – करोनाशी लढा देत असताना राज्याच्या अर्थव्यवस्थेचा गाडा गाळात रुतला आहे. अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून २० एप्रिलपासून काही भागात काही उद्योग आणि सेवा क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने करोनाचा पार्श्वभूमीवर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील काही प्रमाणात उद्योग, सेवा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या जिल्ह्यात मालवाहतूक सुरू राहिल, दोन जिल्ह्यांमध्ये मालवाहतूक करता येणार नाही. तसेच सर्व सामान्यांसाठीही जिल्हाबंदी कायम राहणार आहे तसेच या काळात कामगारांची वाहतूक करता येणार नाही, त्यांची व्यवस्था कामाच्या ठिकाणी करावी, असेही त्यांनी स्पष्ष्ट केले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, शेती आणि कृषी वस्तूंवर बंधन नाही, जीवनावश्यक वस्तूंवर बंदी नाही, मालवाहतूक होईल पण जिल्हाबंदी कायम राहणार आहे. किमान ३ मेपर्यंत बंधन पाळणे आवश्यक आहे. वृत्तपत्रांवर बंदी नाही. पेपर स्टॉलवर वृत्तपत्र विक्री सुरु होईल पण मुंबई, पुणेसारख्या शहरात घरोघरी वृत्तपत्र वितरणास बंदी कायम राहील. महाराष्ट्रासाठी वाईटपणा घेण्यास तयार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लवकर रुग्णालयात या, बर होऊन घरी जा

महाराष्ट्रात शनिवारपर्यंत ६६ हजार ७९६ कोरोना टेस्ट केल्या आहेत यातील ९५ टक्के लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ३ हजार ६०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ३०० पेक्षा जास्त लोकांना कोरोनावर उपचार करुन घरी पाठवले आहे. ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय त्यातील ७५ टक्के सौम्य लक्षण असणारे रुग्ण आहेत. जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्राधान्य आहे. करोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अगदी शेवटच्या स्टेजला असताना करोनाचा संसर्ग झालेले हे रुग्ण रुग्णालयात येते आहेत. मात्र असा उशिर न करता सर्दी, खोकला, ताप अशी करोना सदृश्य लक्षणे दिसून आली की तातडीने रुग्णालयात जावे. तुम्ही लवकर रुग्णालयात आलात, तर बर होऊनच घरी जाल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी लोकांना दिला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाणी टंचाई निवारण्याच्या कामाकरिता तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व नळ योजना, विंधन विहीर विशेष दुरुस्तीच्या प्रशासकीय मान्यतेस मुदतवाढ

Next Post

वीजग्राहकांनी वीजदेयक भरणा व सेल्फ मीटर रिडींगसाठी महावितरणच्या डिजिटल सुविधांचा वापर करावा

Next Post
वीजग्राहकांनी वीजदेयक भरणा व सेल्फ मीटर रिडींगसाठी महावितरणच्या डिजिटल सुविधांचा वापर करावा

वीजग्राहकांनी वीजदेयक भरणा व सेल्फ मीटर रिडींगसाठी महावितरणच्या डिजिटल सुविधांचा वापर करावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo