Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ठाणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न;खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-पालकमंत्री एकनाथ शिंदे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
ठाणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न;खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-पालकमंत्री  एकनाथ शिंदे

ठाणे  दि.09:- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषि निवीष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात याशा सूचना नगरविकासमंत्री  तथा ठाणे  जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिल्या.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या पिकांचे नियोजन, बी-बियाणांची उपलब्धता, रासायनिक खते, औषधे आदी बाबींच्या पूर्वतयारीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली.यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  माने  यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 पालकमंत्री  श्री.शिंदे म्हणाले,ठाणे  जिल्हयात ६५हजार ९०९हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, नगली,तृण धान्य, कडधान्य, गळीत धान्य  क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी ११हजार ५०० क्विंटल बियाणांची गरज आहे. 
शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे थेट बांधावर खते कृषि निवीष्ठा उपलब्ध करुन देण्यासोबतच यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हयगय करु नका. कृषि निवीष्ठाबाबत लक्ष ठेवणे आवश्यक असून यामध्ये जादा दराने विक्री होणार नाही तसेच याबाबत शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचनाही श्री.शिंदे  यांनी दिल्या.

शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या बियाणांची उगवणक्षमता दर्जेदार असावी असे सांगून श्री.शिंदे  म्हणाले, कृषि विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व त्याच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. खत मागणी व पुरवठा, कृषि निविष्ठा विक्रेत्यांची संख्या, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांसाठी नमुन्याचे नियोजन या विषयांवर चर्चा झाली.  जिल्हा खरीप हंगाम 2020 च्या नियोजनाबरोबर  पतपुरवठा वेळेवर होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वेळेवर करा. आतपर्यत ५ कोटी चे वाटप झाले आहे. उर्वरीत वाटप लवकर करावे अशा सुचना संबंधितांना दिल्या. तसेच पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे अशा सुचनाही श्री शिंदे यांनी बँकांना दिल्या. कोरोनामुळे शेतकरी संकटांत आहे. त्यांना सर्व सुविधा तात्काळ बांधावर उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व नियोजन काटेकोरपणे करावे असेही श्री शिंदे यांनी सांगितले. 
कृषी अधिक्षक श्री माने यांनी  सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

गावी जाणाऱ्यांसाठी लालपरीची मोफत सेवा – अनिल परब

Next Post
गावी जाणाऱ्यांसाठी लालपरीची मोफत सेवा – अनिल परब

गावी जाणाऱ्यांसाठी लालपरीची मोफत सेवा - अनिल परब

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d