Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयात एमबीबीएस पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयात एमबीबीएस पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात


७ फेब्रुवारीपर्यंत मुदत; ऑनलाईनद्वारे दुसरी फेरी होणार जाहिर
जळगाव – नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाच्या पहिल्या फेरीच्या प्रवेशप्रक्रियेस १ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. सोमवार, ७ फेब्रवारीपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. यात कोविड नियमांचे पालन करुन महाविद्यालयातील एका भव्य सभागृहात ही प्रवेश प्रकिया सुरु आहे. यात विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी स्वत: त्यांच्याकडुनच कागदपत्रांची पुर्तता करून घेतली जात आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी वर्गवारीनुसार गुणवत्ता यादी यापुर्वीच जाहीर झालेली आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र टिम
एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र टिम डीन डॉ. एन.एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आली असुन प्रवेश प्रक्रियेचे नोडल अधिकारी म्हणुन डॉ. दिलीप ढेकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डॉ. देेवेंद्र चौधरी, विजय मोरे, मिलींद सरोदे, अमोल बोंडे, पंकज राणे यांचा या टिममध्ये समावेश आहे. तसेच राजू राणे, रितेश बोरोले, गजानन जाधव, जितेंद्र महाजन, संजय भिरूड, शरद सोनवणे, गुणवंत कोल्हे, भूषण चौधरी, विकास पाटील, परेश बोरोले, राजेश पाटील हे परिश्रम घेत आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा उपलब्ध – डॉ. दिलीप ढेकळे
एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातून येणार्‍या सर्व पालक- विद्यार्थ्यांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातच आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती प्रवेश प्रक्रियेचे नोडल अधिकारी डॉ. दिलीप ढेकळे यांनी दिली. कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना कुठेही बाहेर जाण्याची गरज पडू नये याची दक्षता महाविद्यालयाकडुन घेतली जात आहे. दि. १३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून दि. १४ फेबु्रवारीपासून एमबीबीएसचा महाविद्यालयीन अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचेही नोडल अधिकारी डॉ. ढेकळे यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागरिकांना आवाहन

Next Post

राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उंचावत मोक्षदा ठरली रोल मॉडेल – डॉ.उल्हास पाटील दैदिप्यमान यशप्राप्तीसाठी मोक्षदा चौधरीवर अभिनंदनाचा वर्षाव

Next Post
राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उंचावत मोक्षदा ठरली रोल मॉडेल – डॉ.उल्हास पाटील दैदिप्यमान यशप्राप्तीसाठी मोक्षदा चौधरीवर अभिनंदनाचा वर्षाव

राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उंचावत मोक्षदा ठरली रोल मॉडेल - डॉ.उल्हास पाटील दैदिप्यमान यशप्राप्तीसाठी मोक्षदा चौधरीवर अभिनंदनाचा वर्षाव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo