Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम-गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम; सहभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/12/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम-गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम; सहभागाचे आवाहन

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येते. यापूर्वी रामदेववाडी, कुऱ्हाडदा, धानोरा, पद्मालय इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम, शिरसोली येथे वृक्षारोपण, कुऱ्हाडदा शाळेत छत टाकून दिले होते.

यावर्षी शहरातील निवडक शाळांमध्ये सापशिडीसह विविध खेळांद्वारे “चारित्र्य निर्माणा”च्या मूल्य शिक्षणावर आधारित कार्यक्रमाचे दि. ११ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने गांधी रिसर्च फाऊंडेशनने एक सापशिडी तयार केली आहे. या खेळाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच खेळातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार असून संवाद साधण्यात येणार आहे. ज्या शाळांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे असेल त्यांनी समन्वयक गिरीश कुलकर्णी (९८२३३३४०८४) यांचेशी संपर्क साधावा.

खालील शाळांचा सहभाग
या उपक्रमात जळगाव शहरातील खालील शाळांचा सहभाग राहणार आहे. दि. ११ डिसेंबर रोजी श्रीराम विद्यालय (प्राथमिक व माध्यमिक), शारदा विद्यालय व विद्या इंग्लिश मिडीयम स्कुल, दि. १२ डिसेंबर रोजी जय भवानी शिक्षण मंडळ संचालित या. दे. पाटील विद्यालय, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल (प्राथमिक व माध्यमिक), के. जी. मणियार प्राथमिक शाळा तर दि. १३ डिसेंबर रोजी ब. गो. शानभाग विद्यालय, जिजामाता विद्यालय (प्राथमिक व माध्यमिक) व शकुंतला माध्यमिक विद्यालय या संस्थांचा समावेश असणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. सुनील नेवे यांचा राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत तृतीय पारितोषिकाने सन्मान

Next Post

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ साठी अर्ज करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ साठी अर्ज करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo