Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तांबापुरातील वीजचोरीला लगाम केव्हा बसणार?महावितरणची कृपादृष्टी की भोंगळ कारभार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
तांबापुरातील वीजचोरीला लगाम केव्हा बसणार?महावितरणची कृपादृष्टी की भोंगळ कारभार

जळगांव(चेतन निंबोळकर)- एकीकडे वाढीव वीज देयकांमुळे वीजग्राहक मेटाकुटीला आले असतानाच दुसरीकडे सर्रास वीजचोरी केली जात असून त्यांच्यावर कारवाईचे प्रमाण कमी आहे. वाढत्या वीजचोरीचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवरही होत आहे. त्यामुळे भर भरून  काढण्यासाठी त्याचा फटका सामान्य वीज ग्राहकांना बसतो. याबाबत सविस्तर असे की, असाच गैरप्रकार मेहरुण मधील तांबापुरा भागात दिसून आला. या झोपडपट्टी भागात नागरिकांनी भर दिवसा विज खांबावर सर्रास आकोडे टाकलेले दिसून आले. तसेच शिरसोली रोडवरील झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी देखील मुख्य रस्त्यावरील विज खांबावर आकोडे टाकलेले यावेळी दिसून आले. तर हा सर्व गैरप्रकार महावितरण विभागाला दिसत नसेल का? की या गैरप्रकाराकडे महावितरण विभाग अर्थपुर्ण दुर्लक्ष करतेय? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.

याबाबत सत्यमेव जयते न्यूज ने मागे देखील या गैरप्रकारा बाबत वृत्त प्रकाशित केले होते. तरी देखील महावितरण विभागाला जाग आली नाही. एकट्या तांबापुरा या झोपडपट्टी भागातून हजारो व्हॅट वीज चोरी केली जाते व या चोरलेल्या विजेची भर काढण्यासाठी महावितरण विभाग सामान्य ग्राहकाला अव्वाच्या सव्वा बिल देत असते. या वीजचोरांना लगाम घालण्यास ३३/११ के.व्ही. उपकेंद्र महाबळ, मेहरूण या महावितरण कार्यालयाला अपयश आल्याचे दिसून येते. वीज चोरी ही एक मोठी समस्या आहे. नियमित वीज बिल भरूनही अनेकांना भारनियमनचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तर आता तरी महावितरण विभागाला जाग येऊन या गैरप्रकारावर कारवाई करेल का? याकडे लक्ष लागून आहे.

अनर्थ घडल्यास जबाबदार कोण? 

वीज चोरीच्या गैरप्रकारामुळे महावितरण विभागाला अखंडित वीज सेवा देण्यास अडथळा निर्माण होतो तर मुख्य वीज खांबावर आकोडा टाकल्याने विजेचा भार कमी जास्त होऊन वारंवार शॉर्टसर्किट होणे, रोहित्र जळून आग लागणे तसेच या गैरप्रकारामुळे तांबापुरातील झोपडपट्टीत आग लागून मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता  नाकारता येत नाही.

संगनमताशिवाय चोरी शक्य नाही

वीज चोरी करणारा व्यक्ती आणि वीज खांबावरील परिपूर्ण माहिती असलेल्या वीज कर्मचाऱ्याच्या संगनमताशिवाय हा प्रकार शक्य नाही. त्यातच शहरातील काही वस्त्यांमध्येही अनधिकृतपणे तारांवर आकोडा टाकणे सुरू आहे. हा प्रकार चुकीचा असून त्याचा भुर्दंड अप्रत्यक्षपणे प्रामाणिक ग्राहकांवर पडत आहे. वीज कंपन्यांनी तातडीने हा प्रकार करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नॅशनल युथ कौन्सिल जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल बाविस्कर तर जिल्हा सचिवपदी आकाश धनगर

Next Post

राजकारणाची दिशा फक्त युवकच बदलू शकतो मग तो ८० वर्षाचे युवक असला तरी- श्रीकांत शिंदे

Next Post

राजकारणाची दिशा फक्त युवकच बदलू शकतो मग तो ८० वर्षाचे युवक असला तरी- श्रीकांत शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d