Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तृतीयपंथी, माध्यम छायाचित्रकारांना महिनाभराचा किराणा भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

उडाण दिव्यांग केंद्र, इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बायव्ह्यू, रोटरी क्लब जळगाव स्टार्सचा उपक्रम

जळगाव, दि.२३ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असून माध्यम छायाचित्रकार आणि तृतीयपंथी बांधवांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, इनरव्हील क्लब ऑफ बॉम्ब बायव्ह्यू आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सतर्फे माध्यम छायाचित्रकार व तृतीयपंथी बांधवांना महिनाभर पुरेल असा किराणा भेट देण्यात आला.

दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या पोस्टल कॉलनीतील कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रमात औपचारिकता म्हणून काही किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, चेतन वाणी, प्रवीण चौधरी, विनोद शिरसाळे, जयश्री पटेल, रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सचे अध्यक्ष धनराज कासट, सागर मुंदडा, जिनल जैन, निरज अग्रवाल, राहुल कुकरेजा आदी उपस्थित होते.

इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बायव्ह्यूच्या अध्यक्ष स्मिता झुंझूनवला, रजनी बसेरिया यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले आहे. लॉकडाउन काळ असेपर्यंत उडाणच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्तींना मदत पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. किराणा किटमध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ डाळ, चहा, साखर, तिखट, हळद, तेल, साबण, कांदा, बटाटे, टूथपेस्ट, सॅनिटायझर, फरसाण, मास्कचा समावेश आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद; सकारात्मक प्रतिसाद

Next Post

जामनेर तालुक्यात दहा हजारांवर अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात; रुग्ण बरा होण्याचा दर वाढला

Next Post

जामनेर तालुक्यात दहा हजारांवर अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात; रुग्ण बरा होण्याचा दर वाढला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo