Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिल्लीकरांनी नवीन राजकारणाला जन्म दिला, हेच राजकारण देशाला 21 व्या शतकात नेईल -केजरीवाल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/02/2020
in राजकारण, राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read

नवी दिल्ली – हा विजय केवळ दिल्लीचा नसून संपूर्ण देशाचा आहे अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली. दिल्लीत तिसऱ्यांदा सत्ता स्थापित करू पाहणारे केजरीवाल यांच्या मते, दिल्लीकरांनी आज निवडणुकीच्या निमित्ताने नवीन राजकारणाला जन्म दिला. हेच राजकारण दिल्लीसह देशाला 21 व्या शतकात नेईल. केजरीवाल यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी वंदे मातरम, इन्कलाब झिंदाबाद आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले, की दिल्लीकरांनी या निवडणुकीत मतदार मतदान कुणाला देणार हे देखील स्पष्ट केले. साऱ्या देशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये हाच संदेश दिला जाईल. यापुढे मतदान त्यालाच दिले जाणार जो मोहल्ला क्लिनिक निर्माण करेल… यापुढे मतदान त्याला मिळेल जो 24 तास वीज पुरवठा करेल… आता मतदान त्यालाच मिळेल जो घरा-घरांमध्ये मोफत पाणी देईल. एकूणच दिल्लीच्या जनतेने देशवासियांना नवी उमेद दिली आहे. हीच भारत मातेची देणगी आहे असे ते पुढे म्हणाले आहेत.

आपल्या मुलाला तिसरी संधी दिलात त्याबद्दल धन्यवाद

विजयानंतर प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी दिल्लीची जनता, आपचे कार्यकर्ते आणि आपल्या कुटुंबाचे देखील आभार मानले. कार्यकर्त्यांसह आपल्या पत्नी आणि कुटुंबियांनी सुद्धा दिवस-रात्र मेहनत घेतली. त्यामुळे, त्यांचे देखील आभार मानतो. दिल्लीच्या जनतेने मला मुलगा मानून साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. सोबतच, योगा-योगाने आज मंगळवार आहे आणि हनुमानाचा दिवस आहे. त्यामुळे, हनुमानाचे देखील आभार मानतो. आता ईश्वराने मला आणखी 5 वर्षे याच उत्साहाने काम करत राहणे आणि दिल्लीला सर्वात सुंदर बनवण्याची शक्ती द्यावी अशी कामना केजरीवालांनी केली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

हिंगणघाट येथे झालेल्या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर योग्य शिक्षा व्हावी -वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद यांची मागणी

Next Post

सुंमीरा- एक अनोखी कथा

Next Post
सुंमीरा- एक अनोखी कथा

सुंमीरा- एक अनोखी कथा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d