Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांगांची पतंग उडाली उंच, उडान पतंगोत्सवाने आणली रंगत!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/01/2023
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
दिव्यांगांची पतंग उडाली उंच, उडान पतंगोत्सवाने आणली रंगत!

रुशील फाऊंडेशनचा उपक्रम, महापौर जयश्री महाजनांचे सहकार्य

जळगाव, दि.१४ – ‘उडी उडी जाय, दिल की पतंग तेरी उडी उडी जाय’ म्हणत एकाहून एक आकर्षक पतंग उडवत गीत व संगीताच्या तालावर दिव्यांग बालकांनी ठेका धरला होता. रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशनने महापौर जयश्री महाजन यांच्या सहकार्याने यंदाचा ६ वा उडान पतंगोत्सव पार पडला. पतंगोत्सवात ‘उडान’ संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तसेच जळगावकर नागरिकांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला.

मकरसंक्रांती सणानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मणियार मैदानावर रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशनद्वारे महापौर जयश्री महाजन यांच्या सहकार्याने शनिवार दि.१४ रोजी पतंगोत्सव घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ.शांताराम सोनवणे, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, ऍड.जमील देशपांडे, नगरसेविका ऍड.शुचिता हाडा, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रा.राकेश चौधरी यांची उपस्थिती होती. उडाणच्या संचालिका हर्षाली चौधरी यांनी प्रास्ताविक सादर करताना संस्थेच्या उद्दिष्टांची आणि कार्याची माहिती दिली.

मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या पतंगोत्सवात उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या ७० विद्यार्थ्यांनी गाण्याच्या तालावर मनसोक्त पतंग उडवत विविध गीतांवर नृत्य करून आनंद लुटला. त्यांच्यासोबत त्यांचे पालक आणि नागरिक देखील उपस्थित होते. याप्रसंगी सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी सेल्फी घेत उत्साह दाखविला. तसेच सर्वांनी एकमेकांना तिळगुळ देत भोगी व मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

उपक्रमासाठी हेतल पाटील, जयश्री पटेल, सोनाली भोई, देवकी महाजन, प्रतिभा पाटील, महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाळधी महामार्ग यांच्या कडुन हेल्मेट वाटप

Next Post

जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी

Next Post
जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी

जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d