Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांगांनी नाटिकेतुन गांधीजींचा जीवन प्रवास उलगडला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
दिव्यांगांनी नाटिकेतुन गांधीजींचा जीवन प्रवास उलगडला

दिल्ली येथील दिव्यांग कलाकरांसमवेत डॉ. अनिल काकोडकर, तुषार गांधी, डॉ. भालचंद्र नेमाडे, सेवादास दलीचंदजी ओसवाल, अशोक जैन, प्राचार्य जे. पी. राव, वंदना सहगल, प्रेरणा गुप्ता व मान्यवर

जळगाव दि. 3 (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींच्या 150 वी जयंतीनिमित्त अनुभूती इंटरनॅशनल निवासी शाळेमध्ये संध्याकाळी गांधी विचारांवर दिव्यांगांनी नाटिकेतून प्रकाश टाकला. गांधीजींनी केलेल्या दांडी यात्रा, सत्याग्रह, सत्य, अहिंसेतुन मिळवुन दिलेल्या स्वातंत्र्याचा प्रवास नाटिकेतुन उलगडून दाखविला.

यावेळी आंतरराष्ट्रिय ख्यातीचे शास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, गांधीजींचे पणतू तुषार गांधी, डॉ. भालचंद्र नेमाडे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त सेवादास दलीचंदजी ओसवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फूडसचे कार्यकारी सुनील देशपांडे, अनुभूती स्कूलच्या संचालकिका निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव, डॉ. सुभाष चौधरी व जैन परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शात्री यांच्या जयंतीनिमित्त संध्याकाळी दिल्ली येथील दिव्यांग (स्पेशल नीडस्) व्यक्तींसाठी कार्यरत असलेली कलर्ड झेब्रा या संस्थेच्या सदस्यांनी गांधीजींच्या जीवन चरित्रावर आधारित नाटिका सादर केली. चाळीस मिनिटांच्या या नाटिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवन कार्यावर अभिनय, संगीत आणि संवाद यांचा सुंदर मिलाफ रसिकांना गांधीजींच्या विचारांशी एकरूप करीत होता. रेल्वे प्रवासात प्रथम श्रेणीचे टिकीट असताना अपमानीत करून बाहेर काढण्याचा प्रसंग, या घटनेतुन बोध घेत ‘मोहन ते महात्मा’ या प्रवासातील महत्त्वाचे प्रसंग नाटिकेतुन अधोरेखित केले. रसिकांसमोर चंपारण्य सत्याग्रह, गांधी, आंबेडकर यांच्यातील पुणे करार यासह अनेक प्रसंग ऐतिहासिक संदर्भाव्दारे कलाकारांनी अचुक मांडले.

दिल्ली येथील द कलर्ड झेब्रा संस्थेतर्फ हे नाटक सादर करण्यात आले. यातील दहा कलाकार दिव्यांग असून चार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. यातील कुठलेही कलाकार हे व्यावसायिक नसून त्यांच्यावर आठ महिने थिएटर थेरपी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना बोलणे, अभिनय, रंगभूमिवरील वावर हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे संस्थेच्या वंदना सहगल यांनी यावेळी सांगितले. दिल्ली येथील कलर्ड झेब्रा संस्थेचा जळगाव येथे हा तिसरा नाट्य प्रयोग होता. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. मोहनदास करमचंद गांधी यांच्या भुमिकेत कबिर हांडा, महात्मा गांधीजींच्या भुमिकेत देवेश भल्ला, बापूंच्या भुमिकेत नगरदीप मड्डाल, सरोजनी नायडूंच्या भुमिकेत दमयंती मड्डा, अनुरूध्द मेहरा याने रविंद्रनाथ टागोर आणि डॉ. आंबेडकर यांची भुमिका साकारली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माजी आ. शिरीष चौधरी यांचा शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

शिवराम पाटील जळगांव शहर मधून विधानसभा अपक्ष लढणार

Next Post
शिवराम पाटील जळगांव शहर मधून विधानसभा अपक्ष लढणार

शिवराम पाटील जळगांव शहर मधून विधानसभा अपक्ष लढणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo