Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

देशमुख महाविद्यालयात स्वयंसिद्धा अभियानांतर्गत कराटे प्रशिक्षणाचा समारोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
देशमुख महाविद्यालयात स्वयंसिद्धा अभियानांतर्गत कराटे प्रशिक्षणाचा समारोप

देशमुख महाविद्यालयात विद्यार्थिनींनी गिरवले स्वरक्षणाचे धडे

विद्यार्थिनींनी शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक करावी व वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करून आपल्या परिवाराचे नाव उज्वल करावे. महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. त्यामुळे परिस्थितीशी दोन हात करण्याची क्षमतादेखील विकसित करावी, अशी अपेक्षा सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित स्वयंसिद्धा अभियानांतर्गत कराटे प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी उपस्थित नगरसेविका योजना पाटील, नगरसेविका प्राजक्ता देशमुख व भडगाव तालुका महिला दक्षता समितीच्या सदस्य रेखा पाटील या मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.एस.आर. पाटील होते.

महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ‘स्वयंसिद्धा अभियानां’तर्गत २१ मार्च ते २८ मार्च या आठ दिवसात कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात महिलांवर होणाऱ्या आक्रमणास कसा विरोध करावा, तसेच चाकूहल्ला , लाठीहल्ला यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत प्रशिक्षक संदीप मनोरे, ऋषिकेश पाटील व स्वप्निल पाटील यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी अभ्यासासोबत क्रीडांगणावर विविध खेळ खेळावेत. त्यातून त्यांचे मानसिक संतुलन चांगले राहील, असे मत प्रशिक्षक संदीप मनोरे यांनी व्यक्त केले. सदर शिबिराचे उद्घाटन दिनांक २१ मार्च रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. शिबिर यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. दीपक मराठे, साहाय्यक महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. चित्रा पाटील, साहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शिवाजी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिरात महाविद्यालयातील ५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. नेहा भोई हिने केले तर आभार कु. संजना शेलार हिने व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रावेर वनक्षेत्रात वन्यजीवांसाठी पाण्याचा बंदोबस्तच नाही;वनविभागाने दुर्लक्ष

Next Post

रमेशकुमार मुणोत यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Next Post
रमेशकुमार मुणोत यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

रमेशकुमार मुणोत यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo