Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नव्वद दिवस कार्यक्रमासाठी मिशन मोडवर काम करा -प्रधान सचिव

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
नव्वद दिवस कार्यक्रमासाठी मिशन मोडवर काम करा -प्रधान सचिव

पुणे(प्रतिनिधी)- जलजीवन मिशन अंतर्गत ‘९० दिवस कार्यक्रम’ यशस्वी करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, तसेच रेट्रोफिटिंग व नवीन योजनांच्या अंमलबाजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी दिले.पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापुर व कोल्हापुर या पाच जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ व ‘स्वच्छ भारत मिशन’ योजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त सी.डी. जोशी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, महाराष्ट्ट जीवन प्राधिकरण पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, कार्यकारी अभियंता अमित आडे आदी उपस्थित होते.बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘९० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत करावयाच्या कामांबाबत श्री.जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले आणि जिल्हानिहाय आढावा घेतला.

या कार्यक्रमाअंतर्गत रेट्रोफिटिंग व नवीन योजना अंमलबजावणीबाबत कालबद्ध उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व मागण्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी, तसेच पाचही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) , कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग , वरिष्ठ भुवैज्ञानिक , भुजल सर्वेक्षण व विकास यांच्याकडून जिल्हानिहाय जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनमधील योजनांचा सविस्तर आढावादेखील यावेळी घेण्यात आला.

Team Satymev Jayate

Previous Post

दुबई एक्सपोमध्ये ६ चित्रपट, एक मराठी वेब सिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा दाखविण्यात येणार -सांस्कृतिक कार्यमंत्री

Next Post

सामाजिक न्याय मंत्र्यांनी केलेल्या घोषनेनुसार बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध

Next Post
सामाजिक न्याय मंत्र्यांनी केलेल्या घोषनेनुसार बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध

सामाजिक न्याय मंत्र्यांनी केलेल्या घोषनेनुसार बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo