Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बँकर्स मिट

जळगाव (प्रतिनिधी) : नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बँकर्स मिट तसेच आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


आज (दि.१२) सकाळी १०.३० ला जिल्हा बँकेच्या गणेश कॉलनी येथील प्रशिक्षण हॉलमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्‌घाटन रिजनल मॅनेजर अरुण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी झाडाचे रोप देवून स्वागत केले. तसेच जिल्हा बँकेच्या वतीने नाबार्डच्या वर्धापनदिनानिमित्त नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

मेळाव्याचे प्रास्ताविक श्रीकांत झांबरे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी नाबार्ड व नाबार्डची शेतकरी, विविध संस्था याबद्दलची भूमिका विषद केली. यानंतर कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी आर्थिक साक्षरता व डिजीटल सेवांची गरज व त्या ग्राहकांना सहज उपलब्ध होण्यासाठी बँकेने केलेले प्रयत्न व बँकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.


कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. तसेच नाबार्डच्या शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसायांना कमी व्याजदरातील योजनांविषयी माहिती दिली. याप्रसंगी कृषी विभागाचे सहसंचालक अनिल भोकरे, विविध बँकांचे जिल्ह्यातील रिजनल मॅनेजर, सीईओ, कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आर्थिक साक्षरता मेळाव्याच्या प्रसंगी जिल्हा बँकेतर्फे आर्थिक साक्षरता व डिजीटल साक्षरता अंतर्गत पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री.मिश्रा यांनी शेती व शेतीपूरक योजनांविषयी सर्व बँकांनी ग्राहकांना माहिती द्यावी, असे सांगितले. श्रीकांत झांबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बाप रे…साप चावूनही १५ वर्षीय बालकाचे प्राण वाचवण्यास डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांना आले यश

Next Post

वसंत सहकारी कारखाना येथे ऑक्सिजन प्लांट उभारणी करा- दिव्या भोसले

Next Post
वसंत सहकारी कारखाना येथे ऑक्सिजन प्लांट उभारणी करा- दिव्या भोसले

वसंत सहकारी कारखाना येथे ऑक्सिजन प्लांट उभारणी करा- दिव्या भोसले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo