Saturday, May 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी, डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी, डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव

‘अ‍ॅडॉप्टिव्ह लर्निंगसाठी आरोग्य शिक्षण’ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी नागूलकर आणि डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव करताना डॉ. मिलिंद निकुंभ, अॅड नितीन ठाकरे, डॉ. सुदीप काळे, प्राचार्य डॉ. अमृत कौर

जळगाव, दि. १ प्रतिनिधी – जैन डिव्हाईन पार्कमधील निरामय नॅचरोपॅथी सेंटरच्या प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर यांचा नाशिक येथील HEAL-2025 (Health Education for Adaptive Learning) ‘अ‍ॅडॉप्टिव्ह लर्निंगसाठी आरोग्य शिक्षण’ या राष्ट्रीय परिषदेत संशोधन रिसर्च पेपर सादर केला, त्यात त्यांचा द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याने, तसेच डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज  फिजियोथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर यांचा (Exemplary leadership award) अनुकरणीय नेतृत्त्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर नागूलकर दाम्पत्याला मिळालेल्या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले आहे.

 

HEAL-2025 ही नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या फिजिओथेरपी कॉलेजद्वारे आयोजित केलेली एक बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद होती. दि. २६ ते २७ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास २०० फिजियोथॅरपिस्टसचा सहभाग होता. डॉ. जयवंत नागलूकर व डॉ. कल्याणी नागूलकर यांच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे  प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे, महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार परिषद, मुंबईचे अध्यक्ष डॉ. सुदीप काळे, मराठा विद्या प्रसारक समाज फिजियोथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अमृत कौर उपस्थित होते.

 

आरोग्यसेवा शिक्षणात नवीन नवोपक्रम निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून आरोग्यसेवा शिक्षणात सुधारण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून HEAL- २०२५ परिषदेकडे बघितले जाते. संशोधक, अभ्यासकांनी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन रिसर्च पेपर सादर केलेत. त्यामध्ये डॉ. कल्याणी नागूलकर यांनी पेपर सादरीकरण स्पर्धेमध्ये (paper  presentation competition) भाग घेतला होता. त्यामध्ये डॉ. कल्याणी नागूलकर यांनी वरिष्ठ श्रेणीतील विषयानुसार वैज्ञानिक पेपर सादरीकरण केला. (senior category subject specific scientific paper presentation) यामध्ये हात पुनर्वसनाचे मेटा विश्लेषण : संशोधनावर आधारित वापर आणि परिणामकारकता यावर त्यांनी प्रकाश टाकला. (Meta analysis on hand rehabilitation : Usage and effectiveness based on research from 2020-2025) यामध्ये डॉ. कल्याणी नागूलकर यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्यासोबतच काही पुरस्कार देखील देण्यात आले ज्यामध्ये डॉ जयवंत नागूलकर यांना exemplary leadership award प्राप्त झाला. नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉक्टर नागुलकर दाम्पत्याला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या विषयावर मार्गदर्शन

Next Post

ग्रामसेवक-सरपंचांविरुद्ध गंभीर तक्रार; लोणवाडी खु. येथील नागरिक शासकीय सेवांपासून वंचित

Next Post

ग्रामसेवक-सरपंचांविरुद्ध गंभीर तक्रार; लोणवाडी खु. येथील नागरिक शासकीय सेवांपासून वंचित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo