Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निरोगी आयुष्यासाठी मौखिक स्वच्छता महत्वाची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
निरोगी आयुष्यासाठी मौखिक स्वच्छता महत्वाची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचे प्रतिपादन

मौखिक आरोग्य स्वच्छता सप्ताहाचे उदघाटन

जळगाव : दैनंदिन आयुष्यात काम करीत असतांना आपल्या तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्वत: शिस्त लावली तर आजाराला आपण दूर ठेवू शकू, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मौखिक आरोग्य स्वच्छता सप्ताह १ ते ७ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार, ४ ऑगस्ट रोजी रुग्णालयात सप्ताहाचे उदघाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी मंचावर अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.उत्तम तासखेडकर, दंतशल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ.इम्रान पठाण, डॉ.उदय पाटील, डॉ.अनुराधा वानखडे, डॉ. संपदा गोस्वामी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्ज्वल करुन उदघाटन केले. त्यानंतर डॉ.नितीन भारती यांनी प्रस्तावनेमध्ये सप्ताह साजरा करण्याबाबत माहिती दिली. डॉ.इम्रान पठाण यांनी दातांची स्वच्छता कशी ठेवावी याबाबत प्रात्याक्षिकाव्दारे उपस्थितांना माहिती दिली. सकाळी व रात्री असे दोनदा दातं योग्य पध्दतीने घासावे. गुटखा, तंबाखू आदी व्यसनांपासून दूर रहावे, असाही सल्ला दिला. यावेळी डॉ.संपदा गोस्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. एन.एस.चव्हाण् म्हणाले की, आपल्या मुखातून नकळतपणे अनेक जंतू पोटात शिरतात. त्यामुळे प्रत्येकाने तोंडाची नियमित स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. दातांची नियमित तपासणी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सकाळी ओपीडी काळात उपस्थिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी डॉ.क्षितीज पवार, राहुल ब-हाटे, सूर्यकांत विसावे, शेख जुनेद समील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ.नितीन भारती यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा 11 ऑगस्ट रोजी लिलाव

Next Post

चौबारीत कोरोना लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद

Next Post
चौबारीत कोरोना लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद

चौबारीत कोरोना लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo