जळगाव-(प्रतिनिधी) – लॉकडाउनच्या काळात मद्य साठ्यामध्ये ततफावत आढळून आल्याने माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावाने असलेला नीलम वाईनचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जिल्हााधिकारीयांनी दिले आहेत. या आदेशामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असल्याचे बोलले जात आहे.