Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

परिवर्तनच्या वेणुत्सवात ४५ बासरी वादकांनी जिंकली रसिकांची मने -बासरीच्या स्वरात न्हाले जीवन गाणे;यांच्या बरसातीने रसिक चिंब

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
परिवर्तनच्या वेणुत्सवात  ४५ बासरी वादकांनी जिंकली रसिकांची मने -बासरीच्या स्वरात न्हाले जीवन गाणे;यांच्या बरसातीने रसिक चिंब

रसिकांना स्वर्गीय अनुभव देणारा अनोखा परिवर्तनचा कार्यक्रम;बासरीच्या स्वरातून भाऊंना भावांजली

जळगाव-(प्रतिनिधी) – परिवर्तन आयोजित भवरलाल जैन यांना भावांजली महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बासरी वादक योगेश पाटील व त्यांच्या ४५ कलावंतांनी आपल्या कलेतून बासरी वादनातून स्वरांची उधळण केली. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कलाकारांनी लावलेल्या बासरीच्या स्वरांनी अवघा उद्यानाचा परिसर बहरून आला. राग भुपालीपासून सुरू झालेल्या मैफिलीत राग दुर्गा, राग वृंदावनी सारंग, राग यमन व विविध गीते – रघुपती राघव राजा राम, गोपाला गोपाला, ओम जय जगदीश , टिक टिक वाजते, प्यार का नगमा, लकडी की काठी , फ्युजन , ओठो से छूलो तुम , पल पल दिल के पास , मेरे रश्के कमर, पहाडी गीत  छुकर मेरे मन को , पंख होते तो उड आती रे रीम झिम गिरे सावन, सैराट या सारखी काही सिने गीतही बासरीच्या साहाय्याने वाजवून रसिकांची दाद मिळवली.

तबल्यावर साथ श्री. योगेश संदानशिव (अंमळनेर) यांनी दिली. या  कार्यक्रमाला  उद्योगपती अशोक जैन, अनिल शहा, डॉ रेखा महाजन, प्रेम कोगटा, डॉ सुभाष चौधरी,  श. दि. वडोदकर  हे प्रमुख पाहुणे होते. तर महोत्सव प्रमुख अमर कुकरेजा, अनील कांकरिया, अनिस शहा नारायण बाविस्कर , सुदिप्ता सरकार, किशोर पवार यांनी स्वागत व सन्मान केले. प्रास्ताविक महोत्सव प्रमुख अमर कुकरेजा यांनी केले. त्यात या वेणुत्सवाविषयी सांगतांना त्या़नी भवरलाल भाऊंच्या आठवणी सांगत त्यांचे बासरीवरील प्रेम व त्याविषयीच्या आठवणी मांडल्या. नऊ दिवसीय या महोत्सवाचा तिसरा दिवस गर्दीने उच्चांक गाठला होता. अनेक प्रेक्षकांना जागे अभावी निराश होऊन जावे लागले.

सात  ते ४५ वर्षे वयातील कलावंतांनी अप्रतिम असे बासरीवादन करत यमन कल्याण सारखे राग वाजवत उपस्थितांची मने जिंकली.अभिनव अशा ४५ बासरी वादकांच्या वादनाचे अनोखे सादरीकरण परिवर्तनने घडवून आणल्याबद्दल मान्यवरांनी कौतुक केले. या कार्यक्रमातील सर्व कलावंत हे स्थानिक कलावंत होते, त्यांनी मेहनतीने कला आत्मसात केलीय, भावांजली महोत्सवाच्या निमित्ताने जळगावात पहिल्यांदाच असा अनोखा प्रयोग सादर करण्यात आला आहे. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.!आईच्या दुःखद निधनाची वार्ता कळल्यावर सुध्दा सत्यपाल महाराजांनी केले हजारोंचे प्रबोधन…

Next Post

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे १५ व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

Next Post
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे १५ व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे १५ व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo