Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

परिवर्तनतर्फे “भावांजली महोत्सवा” चे २१ फेब्रुवारी पासून आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ ने महोत्सवाची होणार सुरुवात

जळगांव(प्रतिनिधी)- पद्मश्री भवरलाल जैन हे उद्योजकासोबतच कलाप्रिय व्यक्तिमत्व होते. साहित्य, संगीत, नाट्य यात विशेष रूची घ्यायचे, अशा भवरलाल भाऊंना नाट्य, साहित्य, संगीत, चित्रकला, नृत्य अशा कलेतून कलावंतांच्या वतीने आदरांजली वाहणारा भावांजली परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन संस्थेतर्फे दि. २१ ते २९ फेब्रुवारी या काळात आयोजित करण्यात आले आहे.

नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे प्रमुख म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिषभाई शाह, उद्योजक अनिलभाई कांकरिया, अमरभाई कुकरेजा व नंदलालजी गादिया यांची निवड करण्यात आली आहे. जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी भाऊंनी सदैव पुढाकार घेत कलेच्या पोषक वातावरणासाठी पाठबळ दिलं. परिवर्तन ‘भाऊंना भावांजली’ या कला महोत्सवाचे आयोजन गेल्या तीन वर्षापासून करीत आहे. नऊ दिवस चालणारा हा महोत्सव भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटरमधे होत असून महोत्सवाची सुरवात आज शुक्रवारपासून होत आहे. पहिल्या दिवशी “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल” हा वारकरी संप्रदायावर आधारीत संगीतमय कार्यक्रम, शनिवारी २२ रोजी महाराष्ट्रभर गाजलेल्या दोन एकांकिका “हलगी सम्राट” व “कस्टमर केअर” यांचे सादरीकरण होईल. २३ फेब्रुवारी रविवारी बासरीवादक योगेश पाटील यांच्या ४५ कलावंतांचा “वेणुत्सव” तर सोमवार २४ रोजी भवरलालभाऊ जैन यांच्या कार्याविषयी “मला कळलेले भाऊ” यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार २५ रोजी “कबीर और हम” हा अभिनव कार्यक्रम तर मंगळवार २६ रोजी “मी का लिहितो” याविषयावर चर्चासत्र होणार असून त्यात ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना. धों. महानोर, जेष्ठ लेखिका मेघना पेठे, कवी अजय कांडर, कवी अशोक कोतवाल, रंगकर्मी शंभू पाटील, रफिक सुरज सहभागी होणार आहेत. बुधवार २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त पुणे येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित अभिवाचन स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त “जातस्य हि” हा कवितेचा कार्यक्रम, गुरुवार २८ फेब्रुवारी रोजी अपर्णा भट व शिष्यांचा “भावरंग भक्तीचे” हा शास्त्रीय नृत्यावर आधारित कार्यक्रम तर महोत्सवाचा समारोप परिवर्तन निर्मित “गांधी नाकारयचा आहे, पण कसा ? ” या अभिवाचनाने होणार आहे.

नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दि. २५ फेब्रुवारी पासून आर्ट गॅलरीमधे चित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. दररोज सायंकाळी ६:३०भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटरमधे जळगावकर प्रेक्षकांना नऊ दिवस उत्तम अशा कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. या महोत्सवासाठी प्रेक्षकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन महोत्सव प्रमुख अनिष शाह, अमर कुकरेजा, नंदलाल गाडीया व अनिल कांकरिया यांनी केले आहे. तर महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम चौधरी, नारायण बाविस्कर, होरिलसिंग राजपूत, वसंत गायकवाड, मंजुषा भिडे, सुदिप्ता सरकार, शिरीष बर्वे , डॉ. किशोर पवार, मिलिंद काळे, अनंत जोशी, विनोद पाटील, प्रमोद माळी मंगेश कुलकर्णी, मोना निंबाळकर, प्रवीण पाटील, राहुल निंबाळकर, सोनाली पाटील, अंजली पाटील, विजय जैन, राजू बाविस्कर, नितीन सोनवणे, अक्षय नेहे, नीलिमा जैन,  रविंद्र डहाके, विकास मलारा, हर्षदा कोल्हटकर, अभिजीत पाटील, बिना मलारा, सुनीता दप्तरी, प्रतीक्षा कल्पराज, योगेश चौधरी, चंद्रकांत इंगळे, प्रभाकर बडगुजर आदी यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विद्यार्थ्यांनी उपक्रमातुन अनुभवली ‘गंमत चुबकाची’

Next Post

नशिराबाद ग्रामपंचायत आरक्षण आक्षेप प्रकरणी २७ रोजी सुनावणी

Next Post

नशिराबाद ग्रामपंचायत आरक्षण आक्षेप प्रकरणी २७ रोजी सुनावणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d