Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी १००% उध्वस्त;नुकसान भरपाई साठी आ.किशोर पाटिल करणार वरीष्ठांकडे पाठपुरावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी १००% उध्वस्त;नुकसान भरपाई साठी आ.किशोर पाटिल करणार वरीष्ठांकडे पाठपुरावा

पाचोरा(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील शेतकरी परतीच्या बेमोसमी पावसामुळे १००% उध्वस्त झाला असून शेतातील ज्वारी मका कपाशी कापूस सोयाबीन या पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले असून त्या पिकांना सततच्या पावसामुळे अंकुर फुटलेले आहेत, अशी भयानक परिस्थिती पाचोरा भडगाव तालुक्यात निर्माण झाली असून शेतकरी हवालदिलझालेला आहे. पाचोरा भडगाव तालुक्यातील तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना आदेश देण्यात आले होते की तात्काळ वरील पिकांचे पंचनामे करून तसा अहवाल दहा नोव्हेंबरच्या आत जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सादर करावा.परंतु आज आ. किशोर पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार यांच्यासमवेत आज रोजी पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केलीअसता अत्यंत भयानक परिस्थिती दिसून आली. मका, ज्वारी, कपाशी, सोयाबीन, कापूस या पिकांना अति पावसामुळे अंकुर फुटलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर केलेला खर्च पूर्णतः पाण्यात गेला असून शेतकऱ्याचे १००टक्के नुकसान झालेल आहे. पाचोरा- भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यांना या पावसामुळे दिवाळी सुद्धा साजरी  करता आली नाही. कारण त्यांचा आता तोंडाचा घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. म्हणून आ. किशोर पाटील यांनी नव्याने आदेश देत तलाठी, कृषी, अधिकारी ग्रामसेवक यांनी शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात वेळ खर्ची न घालता आपल्या सहकारी रेकॉर्डमध्ये पिकपेरा लावला असेल त्यानुसार सरसकट नुकसान भरपाई देण्याचा अहवाल जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे त्वरित सादर करावा आणि शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला शेतमजुराला तात्काळ मदत द्यावी. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाचोरा भडगाव तालुक्यात सततच्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईची माहिती देऊन तात्काळ मदतीची मागणी करणार आहे.
अशी माहिती आ. किशोर पाटील यांनी आपल्या शिवसेना पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली   पत्रकार परिषदेला कृ.उ.बा. समितीचे माजी सभापती अँड. दिनकर देवरे, जि.प. सदस्य पदमसिंह पाटील, जिल्हा शिवसेना उपप्रमुख प्रा. गणेश पाटील, अँड. अभय पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख पप्पू राजपूत, नाना वाघ, विजय भोई उपस्थित होते.  

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दुचाकी वाहनांसाठी 7 नोव्हेंबरपासून नवीन नोंदणी क्रमांक मालिका कार्यान्वित

Next Post

आ.लताताई सोनवणे यांचा हरित सेनेच्या वतीने सत्कार

Next Post

आ.लताताई सोनवणे यांचा हरित सेनेच्या वतीने सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d