Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा येथे महालसीकरणाला उदंड प्रतिसाद; ७८५३ नागरिकांना घेतला लसीचा लाभ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read

पाचोरा(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या ब्रीदवाक्याप्रमाणे आज पाचोरा शिवसेनेच्या वतीने शहरातील विविध सहा भागात कोरोना प्रतिबंधात्मक महालसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या महालसीकरणात आज तब्बल ७८५३ नागरिकांना लसींचा पहिल्या व दुसऱ्या डोसचा लाभ घेत शहरात लसीकरणाचा एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यातून शिवसेनेने आपल्या आपल्या समाजाभिमुख कार्याचा पुन्हा एकदा प्रत्यय शहरवासीयांपुढे ठेवल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात समाधानाचा भाव उमटतांना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती.त्यातच शहरातील विविध टोकाला राहणाऱ्या वयस्क व्यक्तींना लस घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते व तासंतास थांबावे लागत होते.याची दखल घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रशासनाला सूचना करत शहरातील विविध भागात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार आज शहरातील चिंतामणी कॉलनी परिसरातील शिवतीर्थ पटांगणात, ड्रीम सिटी भागातील पालिकेने विकसित केलेल्या ओपन स्पेस मध्ये तसेच एम आय डी सी कॉलनी परिसरात,राजीव गांधी कॉलनी परिसरात, गणपती मंदिर ओपन स्पेस, संघवी कॉलनी परिसरातील सुनील झोपे यांचे घराशेजारील ओपन स्पेस मध्ये तसेच सिंधी कॉलनी भागातील झुलेलाल मंदिर परिसर अशा सहा ठिकाणी महालसीकारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याठिकाणी शिस्तबद्धरित्या नागरिकांना कोविड १९  लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहावयास  मिळत होते.

दरम्यान शहरातील या विविध लसीकरण केंद्रांवर जाऊन युवानेता सुमीत किशोर अप्पा पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर ,आदित्य बिलदीकर ,पीबीसी मातृभूमीचे संचालक प्रवीण ब्राह्मणे यांनी  पाहणी करत नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले.शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत असून आ.किशोर पाटील यांच्या प्रती आभाराचे भाव उमटतांना दिसत आहेत.महालसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील ,माजी उपजिल्हा प्रमुख ऍड दिनकर देवरे,पप्पू राजपुत, बापू हटकर ,नगरसेवक राम केसवानी,नगरसेवक शीतल सोमवंशी, गजेंद्र पाटील, योगेश पाथरवट, सागर पाटील, अनिल राजपूत, नितीन चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

रक्तदान शिबीरानिमित्त मुख्यमंत्री यांनी केले लोकमत वृत्तपत्र समूहाचे अभिनंदन

Next Post

महाविकास आघाडी सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते, यासंदर्भात भाजपा वतीने जाहीर निषेध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo