Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाडवा पहाट” या मैफिलीत सुरांची अतिशबाजी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
पाडवा पहाट” या मैफिलीत सुरांची अतिशबाजी

जळगाव – (प्रतिनिधी) – सालाबादप्रमाणे यावर्षी पण स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित दिवाळी “पाडवा पहाट” या कार्यक्रमाचे २३ वे पुष्प आज रोजी महात्मा गांधी उद्यानात गुंफले गेले. या कार्यक्रमास कैलासवासी नत्थु शेठ चांदसरकर चारिटेबल ट्रस्ट, श्री प्लायवूड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.
सुरुवातीला वरुण नेवे यांनी प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदना सादर केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी प्रमुख उपस्थित मेजर नाना काका वाणी, राजेंद्र कुलकर्णी व सौ. निशा भाभी जैन यांचे स्वागत केले. यांच्यासोबतच आजचे कलाकार सुरमणी धनंजय जोशी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
त्यानंतर सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनंजय जोशी यांना तबल्याची संगत कार्तिकस्वामी दहिफळे, संवादिनीची साथ श्रीराम जोशी, तर पखवाजाची साथ अमोल लाकडे व मंजिरीची साथ प्रसन्न भुरे या युवा कलावंतांनी केली, आणि सुरू झाली एक एक सुरेल मैफल.
सुरुवातीला अहिर भैरव रागातील “अलबेला साजन आयो रे” ही तीन तालातील बंदीश सादर केली. त्यानंतर त्याला जोडूनच जय जय गौरीशंकर नाटकातील “जय शंकरा गंगाधरा” या नाट्यपदाने मैफिलीत रंगत भरली. पं. भीमसेन जोशींनी अजरामर केलेली “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल” सादर केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेले “अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग” हा अभंग सादर केला “पद्मनाभा नारायणा” या गीता बरोबरच “मर्मबंधातली ठेव ही प्रेम मय ” या नाट्यपदाने मैफिलित रंग भरला. “बाजी मुरलिया बाजे रे” “संत भार पंढरीत” “कानडा राजा पंढरीचा” “अवघी गरजे पंढरपुर” या अभंगांनी मैफिल एका उंचीवर जाऊन पोहोचली. “तमनीशे चा सरला” या भैरवीने मैफलीची सांगता झाली. तत्पूर्वी गेल्या वर्षभरात प्रतिष्ठानच्या वतीने आपली कला सादर करणाऱ्या युवा व आश्वासक अशा स्थानिक कलावंतांचा सत्कार करण्यात आला व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

पाडवा पहाट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नुपूर चांदोरकर खटावकर यांनी केले दीर्घकाळ स्मरणात राहील अशा मैफिलीचे आयोजन प्रतिष्ठानच वतीने करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ. राजूमामांचा “मॉर्निंग वॉक” प्रचार, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

गुलाबराव पाटील यांचे राजकीय जीवन जनतेच्या सेवेसाठी अर्पण-प्रचारादरम्यान जनतेच्या प्रतिक्रिया

Next Post
गुलाबराव पाटील यांचे राजकीय जीवन जनतेच्या सेवेसाठी अर्पण-प्रचारादरम्यान जनतेच्या प्रतिक्रिया

गुलाबराव पाटील यांचे राजकीय जीवन जनतेच्या सेवेसाठी अर्पण-प्रचारादरम्यान जनतेच्या प्रतिक्रिया

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo