Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याची गरज; प्रकल्प व्यवस्थापन संस्थांनी कामांना गती द्यावी -पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांचे निर्देश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
आपले आरोग्य आपल्या हाती -पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई(प्रतिनिधी)- जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे याकामी नियुक्त करण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थांकडून कामे गतिमान होतील, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थांच्या (पीएमसी) कामकाजासंदर्भात मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ह्रषिकेश यशोद, मुख्य अभियंता सर्वश्री राजेश निघोट, श्री. रहाणे, श्री. लोलापवार, संचालक (वित्त) श्री. मडके, अधीक्षक अभियंता पी. आर. नंदननवरे व प्रशांत भामरे यांच्यासह प्रकल्प व्यवस्थापन संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे कमीत कमी 55 लीटर प्रति माणसी प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे या मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे या योजनेतून जी कामे राज्याच्या विविध विभागात सुरु आहेत, ती वेळेवर पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रकल्प व्यवस्थापन संस्थांनी संबंधित गावांचा सर्व्हे करुन प्रकल्प अहवाल वेळेत देणे आवश्यक आहे. या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा होता कामा नये, असे पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोकण, नागपूर, या सहा विभागातील एकूण 456 योजनांपैकी 198 योजनांसाठी प्रकल्प व्यवस्थापन संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने या संस्थांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही ही कामे संस्था वेळेवर पूर्ण करतील, यासाठी नियमितपणे पाठपुरावा करणे आणि आढावा घेणे आवश्यक असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी नमूद केले.औरंगाबाद विभागात 18, पुणे विभागात 50, नाशिक विभागात 80, अमरावती विभागात 34, कोकण विभागात 16 अशा 198 योजनांसाठी प्रकल्प व्यवस्थापन संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांनी प्रकल्प अहवाल तयार करुन तातडीने तो विभागाकडे सादर करण्याच्या सूचना पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वातानुकुलित मिनी बस सेवेमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या वेळ आणि पैशांची बचत -पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

Next Post

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

Next Post
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d